राजकीय घडामोडींना वेग, CM फडणवीसांसोबत सव्वा तास चर्चेत काय झालं?
Political developments are gaining momentum; what happened during the hour-and-a-quarter-long discussion with CM Fadnavis?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
48 तासानंतर धक्कादायक खुलासा: :ऐनवेळी बदलला होता अजित पवारांच्या विमानाचा पायलट
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटेल यांनी पक्षाची भूमिका आणि भविष्यातील निर्णयांबाबत महत्त्वाची माहिती दिली.
कोट्याधीश भिकारी ,3 बंगल्यांचा मालक,कार आणि स्वतःसाठी ठेवलाय ड्रायव्हर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सूत्रांच्या माहितीनुसार, बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
हादरलेले कुटुंबीय,आता दादांच्या मृत्यूची बातमी साहेबांना कशी द्यायची
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जवळपास सव्वा तास चर्चा केली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “अजितदादांकडे ज्या महत्त्वाच्या खात्यांचा जबाबदारी होती, ती खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मंत्र्यांना मिळावीत,
एका मेल वर 16 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. प्रशासकीय कामात अडथळा येऊ नये, यासाठी या रिक्त जागांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अजितदादांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार का? या प्रश्नावर पटेल यांनी स्पष्टीकरण दिले.
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली?
त्यांनी सांगितले की, “आजच्या बैठकीत सुनेत्रा वहिनींच्या नावाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला सुनेत्रा वहिनी,
पार्थ आणि जय पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करावी लागणार आहे. शक्य झाल्यास आज रात्री किंवा उद्या सकाळी आम्ही पवार कुटुंबाशी संवाद साधू,” असे पटेल यांनी नमूद केले.
खळबळजनक घटना;नाशिक मध्ये 400 कोटी पळवले? पोलिसांना खबर नाही,
प्रफुल्ल पटेल यांनी पुढे म्हटले की, “आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे, पण तो घाईत घेतला जाणार नाही. पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी यांच्यासोबत सविस्तर बैठक घेऊन, सर्वांच्या आणि जनतेच्या भावना विचारात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नाही, याची कबुली देतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील रिक्त पदे आणि जबाबदाऱ्यांचे वाटप हा प्राधान्याचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
आज अजित पवारांच्या होत्या चार सभा
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या या चर्चेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुधवार, राज्यासाठी धक्कादायक ठरला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादा पवार हे भीषण विमान अपघातात हिरावले गेले. त्यानंतर आता राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार याची चर्चा होत आहे.
तर अजितदादा पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर आले आहे. तर राष्ट्रवादीची खाती आणि मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा ही सुरू झाली आहे. याप्रकरणी मोठ्या घाडमोडी घडत आहे. यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या भेटीत मंत्रिमंडळातील बदल आणि उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नावाची चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीकडील खात्यांबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीची खाती ही इतर नेत्यांना सोपविण्याचा निर्णय होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेली खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांकडे देण्यात यावी यासंदर्भातील पत्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. या नंतर आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
या घाडमोडी घडत असतानाच दुसरीकडे पक्ष एकत्रित करण्याबाबतचा लवकरच अंतिम निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून घेणार आहे. दोन्ही पक्ष एक करण्याबाबत आज किंवा उद्या पवार कुटुंबिय एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यता शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चेत केवळ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे, स्वत: शरद पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी होते. अजित पवार नसल्यामुळे आता पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत.
कोणाला काय द्यावं, कोणाला काय देते, याचे उत्तर माझ्याकडे नाही. पण एक आहे की भाजपला सगळंच पाहिजे आहे. आता जी व्यवस्था आहे ,
ती ठेवावी लागते म्हणून नाहीतर भाजपने शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना बिन खात्याचे मंत्री करून टाकले असते. मुख्यमंत्र्याकडे ऊर्जा, होम, जीएडी अशी मोठं मोठी खाती आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांना दौरे हे करावे लागतात, निवडणूक प्रचारात सर्वाधिक मुख्यमंत्री फिरतात.
निवडणूक जिंकण्यासाठी देशात नरेंद्र मोदी फिरतात आणि राज्यात निवडणुकीत मुख्यमंत्री दौरे करतात. राज्यात कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती निर्माण झाली ते आपण पाहतो. सगळ्या घटना हेच सांगतात की यामध्ये व्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे, अशी टीका त्यांनी केली.
अजित दादांच्या दुखद घटनेपासूनच कोणीही सावरलेला नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनभावना सुद्धा आहे, आणि दोन्ही पक्षाच्या वतीने त्याबाबतचे प्रयत्नापूर्वीसुद्धा झालेले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून राजेश टोपे यांनी असं विधान केलं आहे. शरद पवार, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांनी याविषयीचा निर्णय घ्यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.
दादा हयात असताना आमच्या ज्या बैठका झाल्या त्यात त्यांची इच्छा होती की एकत्र यावं.त्या अनुषंगाने त्यांनी बऱ्याचदा आम्हाला बोलवून दाखवलं. एकत्र येणे दोन्ही पक्षाच्या दृष्टीने जास्त योग्य आहे, असे टोपे म्हणाले.









