रोहित पवारांचा ‘चार’ नेत्यांना दम ,म्हणाले ‘सुनेत्रा काकींसोबत वागताना सांभाळून’

Rohit Pawar's 'four' leaders urged to be careful while dealing with Sunetra Kaki

 

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी 27 फेब्रुवारी 2026 रोजी रोहित पवार दाखल झाले, ज्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी (SP) पक्षाच्या या नेत्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या.

 

राज ठाकरेंशी भेटीसाठीचा वेळ मागितला आणि लगेचच हा वेळ मिळाला. सव्वा तास राज ठाकरेंची भेट झाली ज्यामध्ये अजित पवारांच्या अपघाताबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी घटनाक्रम आणि आपल्याकडील माहिती समजावून घेतली. पोलिसांनी एफआयआर का नोंदवून घेतला नाही,

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय;पोलिस चौकशीसाठी कोणालाही अटक करू शकत नाही

असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आपल्य़ाला सर्वोत्त न्यायालयाचे दोन दाखले दिल्याची माहिती रोहित पवारांनी दिली. ‘अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यास एफआयआर घेतलाच पाहीजे हा दाखला राज ठाकरेंनी दाखवून दिला’, असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

 

सदर घटनेमध्ये FIR न होणं ही दु:खद बाब असल्याचच राज ठाकरेंनी म्हणत मराठी माणसाला न्याय मिळत नसेल तर आम्ही आमच्या पातळीवर सर्व प्रयत्न करु असा शब्द रोहित पवारांना दिला.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी तिघे उत्सुक

यादरम्यान, पायलट जिवंत असल्याच्या चर्चा व्यर्थ असून, तसं समजून चालणार नाही आणि असं कोणी सांगत असेल तर चुकीचं आहे असं म्हणत पाचही व्यक्ती दुर्दैवानं वाचलेले नाहीत हीच वस्तूस्थिती त्यांनी मांडली. याचदरम्यान, एका नेत्यांनी ‘नवं पर्व सुरू’ झाल्याचं म्हटलं,

 

पण अजित पर्व संपणारच नाही किंबहुना त्यांच्या अपघाती निधनाविषयी नागरिकांच्या मनात शंका आहे आणि त्याच प्रकणी एफआयआरसाठी नेत्यांनी प्रयत्न करावा असा सूर पवारांनी आळवत अपघाताचा पहिला अहवाल थातुरमातूर दिला तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही, असा इशारात दिला.

 

‘पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा काकी आहेत, उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळं सुनेत्रा काकींसोबत वागताना सांभाळून, कारण महाराष्ट्र बघतोय. महिलांचा आदर ठेवणं महत्त्वाचं असून दादांची वचक काय होती हे लक्षात ठेवा.

मोठा दावा:अजित पवार यांचा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणला?

या चार नेत्यांवरही दादांचा वचक होता. कालच्या कार्यक्रमात जयला जागा कुठे द्यायची हे, नेते ठरवतात. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणतरी ओढतं….हे महाराष्ट्राची जनता बघतेय.

 

सुनेत्रा काकी सक्षम महिला पवार कुटुंबाच्या घटक आहेत आणि मोठ्या नेत्या आहेत. त्या चांगलं काम करतील हा आमचा विश्वास आहे, पण, तुम्ही जरा सांभाळून वागा’, असा सज्जड इशारा रोहित पवारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना दिला.

 

राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट टळले, आता उकाडा वाढणार
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना माध्यमांशी संवाद साधायचा होता का, असा प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर देत,

 

‘काकींचं भाषण मी पाहिलं, त्या अगदी व्यवस्थित बोलल्या. इतरांचं भाषण पूर्वीही पाहण्यासारखं नव्हतं आणि आजही नाही. कोणाला वाटत असेल की अजित पवारांना कंट्रोल करु शकत नव्हते,

 

पण सुनेत्रा पवारांना कंट्रोल करु शकतो तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसांनंतर ताकद काय असते हे त्यांना नक्कीच कळेल’, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या विमान अपघात :रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल

या ‘चार’ नेत्यांनी सांभाळून राहावं असं सांगताना एक पुतण्या म्हणून विनंती काकींनीही सांभाळून राहावं असं म्हणत त्यांनी सावध केलं.

 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर आम्ही सगळे दु:खात होतो असं म्हणत अपघातानंतर राज्यात दुस-या दिवशी कुठेही अडचण होऊ नये,

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द ,काय म्हणाले इम्तियाज जलील

दंगल उसळू नये म्हणून शरद पवारांनी घातपात नसल्याचं स्टेटमेंट दिलं होतं. त्यांना वाचावं लागलं इतके ते भावनिक होते असं सांगत गेल्या काही दिवसांमध्ये विलीनीकरण हा शब्द आपण जास्त वापरला की त्यांनी?

 

असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला. अजित पवारल पक्षातील ‘चार’ लोकांनी विलीनीतरणाच्या विषयाला जिवंत ठेवलं कारण, त्यांचं महत्त्वं दिसत नाही असं म्हणत नाव न घेता काही मोठ्या नेत्यांकडेच रोहित पवारांच्या बोलण्याचा रोख दिसून आला.

मंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुग्णालयात दाखल

 

Related Articles