मंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुग्णालयात दाखल

Minister Chhagan Bhujbal urgently admitted to hospital

 

 

 

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे भुजबळ दौरा सोडून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

 

त्यांच्या अचानक पोटात दुखू लागल्याने अपोलो हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन करण्यात आले. त्यांचे नाशिकचे सगळे कार्यक्रम रद्द करून भुजबळ मुंबईत उपचारासाठी रवाना झाले आहेत.

IT कंपन्यांना बुरे दिन, पाच दिवसात 3 लाख कोटी गमावले

यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. यापूर्वी भुजबळांवर एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

 

राज्याच्या राजकारणातील फायरब्रँड नेते छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आजारपणाचा सामना करत आहेत. त्यांच्यावर गेल्या वर्षाच्या अखेरीस हृदय शस्त्रक्रिया झाली होती.

सुप्रिया सुळें होणार सासू ,ची मुलगी रेवती सुळेंचं लग्न ठरलं

मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया पार पडली. विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

 

त्यानंतर ते अनेक दिवस सामाजिक आणि राजकीय मंचापासून दूर होते. तर डॉक्टरांच्या परवानगीने एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. तर माजी मंत्री धनंजय मुंडे हे सुध्दा त्यांच्या भेटीला त्यावेळी रुग्णालयात गेले होते.

मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय

तर दोन वर्षांपूर्वी 2024 मध्ये छगन भुजबळ हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

तपासणी आणि उपचारानंतर ते पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय झाले होते. एक अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी ओबीसी चळवळीच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातही मोठे काम केले.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचे टायमिंग चुकले असते तर शरद पवारांनी भाकरीच फिरवली असती

ओबीसी नेते म्हणून त्यांनी अनेकदा मोठी भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलनाच्या वेळी त्यांनी ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरत लढा दिला. त्यांनी अनेकदा जहाल शब्दात काही घडामोडींवर प्रखर भाष्य केले आहे.

 

रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जे वक्तव्य केले. त्यांच्यावर कालच छगन भुजबळ यांनी टीका केली. विलिनीकरणानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे हे प्रदेशाध्यक्ष होणार होते असा दावा रोहित पवारांनी केला होता.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय;पोलिस चौकशीसाठी कोणालाही अटक करू शकत नाही

त्या वक्तव्याचा समाचार भुजबळांनी घेतला. आम्हाला विलिनीकरणाविषयी काहीही माहिती नाही आणि अजितदादा सुद्धा याविषयी काही बोलले नाही

 

असा दावा भुजबळांनी केला.विलिनीकरणाअगोदरच रोहित पवारांनी बहतांशी निर्णय आणि पदांचे वाटप केले की काय असा टोलाही भुजबळांनी रोहित पवारांना लगावला.

IT कंपन्यांना बुरे दिन, पाच दिवसात 3 लाख कोटी गमावले

 

Related Articles