महाराष्ट्रावर मोठं संकट, राज्यात काही ठिकाणी शळांना सुट्टी;नागरिकांना सतर्कतेचं आवाहान
Major Crisis Looms Over Maharashtra; Schools Closed in Several Areas of the State; Citizens Urged to Remain Vigilant.

सध्या वातावरणात मोठे बदल पहायला मिळत आहेत, याचा आरोग्यावर देखील मोठा परिणाम होत आहे. एकीकडे महाराष्ट्र उन्हाने चांगलाच तापला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे, अनेक जिल्ह्यांमधील तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलं आहे.
भीमराव हत्तीअंबीरे यांचा मध्य प्रदेश सरकारकडून गौरव
वाढत्या तापमानाचा नागरिकांना चांगलाच फटका बसत असून, रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. दरम्यान राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मोदी सरकारच्या विरोधात राज ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा
नागपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. नागपुरात तापमानाचा पारा वाढला आहे. जिल्ह्यात तापमान 43 अंश सेल्सियस पार पोहचलं आहे.
त्यामुळे हवामान विभागाकडून जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या 18 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाकडून नागपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, तसेच खासगी कोचिंग क्लासेसला देखील सुट्टी देण्यात आली आहे.
राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
उन्हाचा कडाका वाढल्यानं रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. अति महत्त्वाचं काम असेल तरच दुपारच्यावेळी घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहानही प्रशासनच्या वतीने करण्यात आलं आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिक देखील योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहेत.
दरम्यान एकीकडे विदर्भात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे, अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात देखील उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे 40 ते 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शितपेयांच्या मागमीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.
नागरिक उन्हाच्या कडाक्यामुळे घराबाहेर पडणं टाळत आहे. पुढील काही दिवस उन्हाचा कडाका कायम राहू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
पार्थ पवार म्हणाले आता ‘काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल…ऐकुन ‘शरद पवार हसले








