महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातच बेशुद्ध

Fainted right inside the Municipal Corporation's Assistant Commissioner's office.

 

 

नवी मुंबई महानगरपालिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त शिल्पा देशपांडे यांना कामाचा अतिरिक्त ताण आल्याने अचानक चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या.

राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले भोंदू खरातकडे का गेले ?

ही घटना महापालिका मुख्यालयात घडली असून यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक आयुक्त शिल्पा देशपांडे या नेहमीप्रमाणे मुख्यालयात

जिल्हाधिकाऱ्यांचे ड्रॉयव्हर जाणार संपावर

आपल्या कर्तव्यावर होत्या. कामकाजादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्या महापालिका इमारतीच्या तळमजल्यावरील महिला वॉशरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या.

 

वॉशरूममध्ये अधिकारी बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच तेथील महिला सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरक्षा रक्षकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था केली.

राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

शिल्पा देशपांडे यांना तात्काळ नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार,

 

गेल्या काही दिवसांपासून असलेल्या कामाच्या प्रचंड ताणामुळे त्यांना हा त्रास जाणवल्याचे बोलले जात आहे. सध्या डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याला लाच घेताना बेड्या ठोकल्या

 

Related Articles