अजित दादांच्या अपघातावर आमदार अमोल मिटकरींचे खळबळजनक वक्तव्य

MLA Amol Mitkari's shocking statement on Ajit Dada's accident

 

 

अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना झाला. मात्र कुठल्याच प्रश्नांची उत्तर मिळाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

IAS अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई

अजित पवारांचा अपघात की घातपात याची उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहणार, असंही अमोल मिटकरींनी सांगितले.

 

 

रोहित पवारांसोबत मी आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांसोबत मी आहे. कुठल्याही पक्षाचा आमदार आमच्यासोबत असला तर त्यालाही सोबत घेणार, असं अमोल मिटकरी म्हणाले.

राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट टळले, आता उकाडा वाढणार

मला आमच्याच पक्षातले नेते बोलताय, तुम्ही का प्रश्न विचारताय? तुम्ही अजित पवारांच्या अपघातावर का जास्त बोलताय? मला माहिती नाही ते असं का बोलत आहेत. पण मला जे योग्य वाटतं ते मी करतोय, असं अमोल मिटकरींनी यावेळी स्पष्ट केलं.

 

माझ्या पक्षातले काहीजण माझ्यासोबत प्रश्न उपस्थित करतात. आता बाकीचे का प्रश्न उपस्थित करत नाहीत? हे मी सांगू शकत नाही. राजकीय दृष्टिकोनातून जर रोहित पवार आमच्या पक्षाबद्दल बोलत असेल तर मी त्याला उत्तर देणार नाही.

 

मी फक्त अजित पवारांच्या अपघाताबद्दल जर ते प्रश्न विचारत असेल तर त्यांच्यासोबत मी असेल, असंही अमोल मिटकरींनी सांगितले. अधिवेशन सुरू असताना आणि मागच्या महिन्याभरात एक दिवस असा गेला नाही अजित पवारांची आठवण आली नाही.

लाडक्या बहिणींवर मोठं संकट?

अजूनही वाटतं सभागृहात अजित पवार येतील. आमच्याशी चर्चा करतील. देवगिरीला बैठकीला आमच्या सगळ्या आमदारांना बोलवतील, पण आता अजित पवार आमच्यात नाहीत, असं म्हणत अमोल मिटकरी भावूक झाले.

 

अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानानेसकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते.

राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य

यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.

 

अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

IAS अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई

 

Related Articles