उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना धक्का दिला…राज्यभरात संतापाची लाट

Deputy Chief Minister Sunetra Pawar was shocked… a wave of anger spread across the state

 

 

शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.

ChatGPT वरून हायटेक सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार

यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत असे काही घडले की, सोशल मीडियावर संतापाची लाट उसळत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत असे कसे घडून शकते हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपाच्या आशा बुचके यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली.

राज्यसभा निवडणुक ;उद्धव ठाकरें आणि काँग्रेस, शरद पवारांपासून चार हात दूर ,थेट दिल्लीत हालचाली

हेच नाही तर आशा बुचके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत आमदार शरद सोनवणे यांच्याकडून माईक हिसकावून आशा बुचके यांनी भाषणाला सुरूवात केली.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भाषणासाठी उभ्या होत्या. मात्र, तरीही आशा बुचके माईक सोडण्याचे नाव घेत नव्हत्या. सुनेत्रा पवार बुचके यांच्यामागे वाट बघत उभ्या होत्या.

 

उपमुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलची ऐशीतैशी आशा बुचके यांनी केली. फक्त हेच नाही तर पालखीदरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित असताना आशा बुचके या सुनेत्रा पवार यांना चक्क धक्का देतानाही दिसल्या.

११ राज्यांमध्ये पावसाचा इशारा; पुन्हा थंडीचा जोर वाढणार

आशा बुचके यांची हैराण करणारी व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ही पक्षाची शिस्त आहे का? एका उपमुख्यमंत्र्याला धक्का देण्याची असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

यादरम्यान व्हायरल व्हिडीओंनंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आशा बुचके यांच्या या कृत्यावर मोठे विधान केले. रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले की, आशा बुचके यांच वागण खटकण्यासारखं आहे.

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द ,काय म्हणाले इम्तियाज जलील

मुख्यमंत्री यांच्यासमोर अश्या वागत असतील तर हे निषेधार्य आहे. मुख्यमंत्र्यांनी या महिला पदाधिकाऱ्यांना झापलं पाहिजे. यावेळी प्रोटोकॉल अधिकारी झोपले होते का? असा प्रश्नही रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपस्थित केला.

 

पुढे बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले की, यापुढे सुनेत्रा वहिनींसोबत आम्ही शासकीय कार्यक्रमात सोबत राहू असं करणाऱ्यांना तिथल्या तिथे उत्तर देऊ. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे,

अजितदादांच्या अपघातावर बोलताना रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

त्या गोष्टी जाणीवपूर्वक होणार असतील तर आम्ही परतफेड करू असा इशाराही रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे. आता यावर भाजपाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

 

Related Articles