ChatGPT वरून हायटेक सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार

Shocking form of high-tech mass copying from ChatGPT

 

 

 

गडचिरोलीतील चामोर्शी येथील जा. कृ. बोमनवार कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

 

प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर पाठवून त्यावरील उत्तरे चॅट जीपीटीवरून शोधून त्यांची प्रिंट काढून परीक्षा केंद्रात आणल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या केंद्र भेटीदरम्यान समोर आला.

 

या प्रकरणी केंद्र प्रमुखासह दोन शिक्षक आणि एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांनाही निलंबित करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

भाजप नगरसेवक फोडून काँग्रेसच्या पाठिंब्याने महापौरपद मिळविले

18 फेब्रुवारी रोजी राज्यशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना सीईओ सुहास गाडे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने चामोर्शी येथील या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली.

 

तपासणीदरम्यान परीक्षा केंद्राबाहेर चालू विषयाच्या मायक्रो नोट्ससह राज्यशास्त्राच्या चालू पेपरचे प्रश्न चॅट जीपीटीवरून शोधून काढलेल्या उत्तरांचे प्रिंटआऊट मिळून आले. या साहित्यामुळे परीक्षा केंद्रावर नियोजित पद्धतीने सामूहिक कॉपीचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

मंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुग्णालयात दाखल

या गंभीर प्रकाराची दखल घेत सीईओ गाडे यांनी तत्काळ केंद्र प्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत चौकशी समिती स्थापन केली. समितीने सखोल चौकशी करून आपल्या अहवालात सामूहिक कॉपीचा प्रयत्न झाल्याचे नमूद केले.

 

चौकशी अहवालाच्या आधारे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार केंद्र प्रमुख, दोन शिक्षक आणि शाळेच्या शिपायाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लाचखोर तहसीलदाराला पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक

दरम्यान, परीक्षा व्यवस्थेतील शिस्तभंग आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या गंभीर गैरप्रकाराची दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित चौघांनाही तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

 

या घटनेमुळे जिल्ह्यातील परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मंत्रालयात भ्रस्टाचाऱ्यांचे लाच घेण्याची सांकेतिक भाषा उघड

 

Related Articles