मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
Manoj Jarange Patil issues fresh warning of agitation.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाची घोषणा करताना सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते,
महसूल अधिकाऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर
मात्र अद्याप गुन्हे मागे घेतले गेलेले नाहीत, त्यामुळे आता मराठे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावरूनच मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, ‘सरकारने शब्द दिला होता की, सर्व गुन्हे मागे घेतले जातील. जो पर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाही तो पर्यंत मी शांत बसणार नाही. सरकारने तसा शब्द दिलेला आहे.
भाजप सत्तेतल्या मित्रांचीच शिकार करणार ;बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करून सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू. दाखल गुन्ह्यांपैकी 60- 62 गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. त्याबाबत सरकारने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला हवे.
80 गुन्हे असे आहेत त्याबाबत विभागीय समितीने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला लावावेत. सरकार आणि फडणवीस जरी त्यांनी दिलेल्या शब्दापासून बदलले असले तरी त्यांना मी बदलू देणार नाही. कसे गुन्हे मागे घेत नाही मी बघतो, मी खंबीर आहे.’
नदीत नाव उलटून १० जणांचा मृत्यू;पाहा VIDEO
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्णन विखे पाटील यांच्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, ‘जी उपसमिती मराठ्यांची स्थापन झालीये त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं,
त्यांनी दिखावा करण्यासाठी थातुर मातूर बैठका घेऊ नयेत. मराठा समाजाला उप समितीच्या अध्यक्षकडून अपमानास्पद वागणूक चालू आहे, ती थांबली पाहिजे. त्यांना समज पाहिजे मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे.
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठक ?
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठे मराठ्यांच्या अंगावर घालण्यासाठी उपसमिती नाही. त्याचा अध्यक्ष त्यासाठी नाही, तुमचा माज जिरवण्यासाठी उपसमिती नाही.
तुमची मस्ती मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांची झुजांयला लावायच यासाठी उप समिती नसते. ईसीबीसीच्या विद्यार्थ्यांचं काय? सारथीच्या विद्यार्थ्यांचं काय? आरोग्य विभागातील विद्यार्थ्यांचं काय? यासाठी उपसमिती असते.
प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात मोठा बदल केला
आम्हला वाटलं होतं 100% मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, मात्र उपसमितीच्या अध्यक्षांनी उलट उफनायला सुरवात केलीय. मराठे मराठ्यांच्या अंगावर घालवण्याची चळवळ त्यांनी सुरू केली,
त्यांना मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. याने ते कधीच मोठे होणार नाहीत. त्यांच्या डोक्यात हवा शिरली असेल की, मराठे मराठ्यांच्या अंगावर घालले की मराठ्यांचे प्रश्न दाबले जातील. तुम्ही मराठ्या मराठ्यांमध्ये कलगी तुरा लावून जिंकणार नाहीत हे लक्षात ठेवा. तुम्ही खुप चिखलात चालला आहात.
दरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलकांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. गुन्ह्याची पर्वा न करता आंदोलन रेटण्यात आले. मराठा समाजाला कुणबी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी राज्य तीन वर्ष ढवळून निघाले. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हंगामाच्या तोंडावरच आंदोलनाने जोर पकडला होता.
दरम्यान ताज्या अपडेटनुसार, मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन हवतेच विरल्याचे समोर येत आहे. गृहविभागाने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत यासंदर्भातील आकडेवारी सादर केली. त्यात हा खुलासा झाला. मनोज जरांगे पाटील हे यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गृहविभागाने मराठा आंदोलकांवरील गुन्ह्याविषयी माहिती सादर केली. त्यानुसार, मराठा आंदोलकांवर आतापर्यंत दोन टप्प्यात दाखल 1 हजार 509 गुन्ह्यांपैकी 828 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.
तर काही गुन्हे मागे घेण्याबाबत अजून निर्णय घेण्यात आला नाही. 828 गुन्हे मागे घेतल्याने मराठा आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्याने यातील काहींना नोकरीसाठी आणि इतर ठिकाणी अर्जासाठी अडचणी कमी होतील.
पहिल्या टप्प्याच्या आंदोलकातील 17 तर दुसर्या टप्प्यातील 64 असे एकूण 81 गंभीर गुन्हे आहेत. ते मागे घेण्यात येणार नसल्याचे गृहविभागाने मराठा उपसमितीच्या बैठकीत स्पष्ट केले आहेत. आता हे गंभीर गुन्हे काय आहेत हे अद्याप समोर आले नाही. आता या प्रकरणातील आंदोलकांची सुटका होणार नाही, त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
राज्यात दहा वर्षे मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. ही आंदोलनं शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने करण्यात आली. पण अनेक ठिकाणी नंतर आंदोलकांचा संयम सुटला आणि अंतरवाली सराटीत तर पोलिस आणि आंदोलकांमध्ये ताणतणाव दिसून आला. पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आजही जरांगे पाटील करतात.
तर अनेक ठिकाणी खोट्या गुन्ह्यात आंदोलकांना अडकवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो. पहिल्या टप्प्यात 2018 पर्यंत एकूण 548 तर दुसर्या टप्प्यात 961 गुन्हे दाखल करण्यात आल्याचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत समोर आले आहेत.









