उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट
Uday Samant met Sharad Pawar.

उदय सावंत यांनी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओकवर सकाळीच सामंत शरद पवारांच्या भेटीकरिता पोहोचले. या भेटीनंतर बोलताना उदय सामंत यांनी म्हटले की, नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात पवारांची मी भेट घेतली.
सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरे ,सपकाळ-जानकरांना फोन,राष्ट्रवादीच्या पडद्याामागे मोठी घडामोडी
अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार आणि माझी भेट झाली नव्हती. शरद पवार यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबद्दल बोलताना उदय सामंत यांनी म्हटले की, बारामती विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, ही एकनाथ शिंदे यांचीही इच्छा आहे.
देशांत युद्धामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
आता काँग्रेस कशा पद्धतीने पुढे जाते आणि मागे यावर संजय राऊत बोलले आहेत. यावर मला काही जास्त बोलायचे नाही. पण अजित पवार यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्येही काम केले, काँग्रेससोबत काम केले.
राजकारणापेक्षा जर व्यक्ती आपल्यामध्ये नसेल तर त्याठिकाणी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असतील तर ती बिनविरोध करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
घराबाहेर पडणे टाळा,29, 30 आणि 31 मार्चला मोठा धोका,
तीच भूमिका शिवसेनेची आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की, अशाप्रकारचे राजकारण करण्यापेक्षा आपला जो राजकीय संस्कार आहे, तो पुढे घेऊन गेला पाहिजे. महाराष्ट्र एक राजकीय संस्कार असलेले एक वेगळे राज्य आहे,
अशा प्रकारचा संदेश पूर्ण देशभरात जाईल. अंजली दमानिया यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, जर अंजली दमानिया यांच्याकडून सीडीआर पोहोचला असता तर त्यांनी पूर्ण कॉपी दिली असती त्याची.
रविवार असतानाही तब्बल १०३ निर्णय जाहीर
जेडब्लू मॅरेडच्या हॉटेलच्या लेटवर इंग्रजीमधून लिहिलेल्या काही गोष्टी आहेत. त्यात दमानिया यांनीही खुलासा केला आहे की, अनोळखी व्यक्तीने हे त्यांच्याकडे दिलेले आहे.
मी कालही सांगितले की, अशा आरोप प्रत्यारोपामुळे एकनाथ शिंदे यांचे काम काही कमी होणार नाही. उलट जनतेला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे भावतात,
मंदिरात चेंगराचेंगरी; 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू
त्यामध्ये वाढच होईल. कारण एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला राजकीय मोठे होत असताना अशा अडचणी निर्माण करण्याचे काम होत असेल तर ते देखील चुकीचे आहे.
ही भावना महाराष्ट्राच्या जनतेच्या वाढीस लागणार आहे. या प्रकरणाची सखोल चाैकशी झाली पाहिजे, अशी मागणी उदय सामंत यांनी केली. पत्रकार परिषद कोणी घेतली? पत्रकार परिषदेमध्ये कोणी कागदपत्रे दिली,
भोंदू खरातच्या लेकीच्या लग्नपत्रिकेत एकनाथ शिंदेंसह तीन बड्या मंत्र्यांसह बडे राजकारणी प्रमुख पाहुणे
यासर्व गोष्टींची चाैकशी व्हायला हवे, त्यामुळे सर्वकाही बाहेर येईल. मुद्दा असा आहे की, एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन बोलण्यापेक्षा या प्रकरणात संपूर्ण चाैकशी झाली पाहिजे.









