सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरे ,सपकाळ-जानकरांना फोन,राष्ट्रवादीच्या पडद्याामागे मोठी घडामोडी

Sunetra Pawar Calls Uddhav Thackeray, Sapkal, and Jankar; Major Behind-the-Scenes Developments Within the NCP

 

 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

भोंदू अशोक खरातच्या टार्गेटवर थेट शरद पवार? दाव्याने राज्यात खळबळ

शनिवारी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, आज सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रासपचे नेते महादेव जानकर यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली.

 

मात्र, काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बारामती बिनविरोध होण्याच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. काँग्रेसने हायकमांडच्या आदेशानंतर काही दिवसांपूर्वीच बारामती पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी काहींना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत.

VIDEO;अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पकडून मोठा भूकंप;भारताची चिंता वाढली

सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र, सपकाळ यांनी दिल्लीतील हायकमांडचा दाखला देत स्पष्ट केले की, “दिल्लीतून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याचे आदेश आहेत.

 

” काँग्रेस हायकमांड या निवडणुकीसाठी आग्रही असल्याने सुनेत्रा पवारांच्या विनंतीला काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे बारामतीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

दुसरीकडे, महादेव जानकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करताना सावध पवित्रा घेतला. “आम्ही काँग्रेसच्या भूमिकेनुसार आणि महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार पुढील पाऊल उचलणार आहोत,” असे जानकर यांनी स्पष्ट केले.

 

त्यामुळे जानकरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सुनेत्रा पवारांना आता आघाडीच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाची मते लक्षणीय आहेत. त्यामुळे जानकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना

दरम्यान, कालच सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. ठाकरे गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात असली तरी, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

एकीकडे बड्या नेत्यांशी चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे बारामतीमध्ये आतापर्यंत तब्बल १९ अपक्ष आणि इतर उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज आहे.

सुनेत्रा पवारांचा बिनविरोध विजयाचा मार्ग धूसर

 

 

Related Articles