सुनेत्रा पवारांचा बिनविरोध विजयाचा मार्ग धूसर

Sunetra Pawar's Path to an Uncontested Victory Appears Dim

 

 

उपमुख्यमंत्रिपदावर असताना बारामती येथे झालेल्या विमान अपघातात ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

या 4 कारणांमुळे सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण

मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता कमी झाली आहे. कारण काँग्रेस पक्षाने बारामतीसोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. आता काँग्रेस कोणाला रिंगणात उतरवणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मंत्रिमंडळ बैठक ;6 निर्णय

बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

 

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदारपदी विराजमान झाल्या.

 

भोंदू अशोक खरातच्या टार्गेटवर थेट शरद पवार? दाव्याने राज्यात खळबळ

मात्र महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवताना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्या अजित दादांच्या बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

 

दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने लढवल्या होत्या. बारामतीत सुनेत्रा पवार उमेदवारी करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

 

अद्याप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका समोर आली नाही. परंतु वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष काँग्रेसला पाठिंबा देण्याचे संकेत आहेत.

VIDEO;अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पकडून मोठा भूकंप;भारताची चिंता वाढली

लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली आणि दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी दिली, तर बिनविरोध निवडणूक करण्याची राजकीय संस्कृती महाराष्ट्रात जपली जात होती. मात्र गेल्या काळात या परंपरेला छेद दिल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळालंय.

 

आताही अजितदादांसारख्या ताकदवान नेत्याच्या कुटुंबातील सदस्य, उपमुख्यमंत्री असलेल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बालेकिल्ला बारामतीतच शड्डू ठोकून काँग्रेसने मोठे धाडस दाखवले आहे.

 

राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येत्या ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात “घोंगडी बैठकांना” सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना

 

Related Articles