“जगणं कठीण झालंय”म्हणत न्यायाधीशाची आत्महत्या
Judge Commits Suicide, Saying "Life Has Become Difficult"
पुणे येथील नामांकित सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका जजने टोकाचं पाऊल उचललं. दिल्लीच्या सफदरजंग भागात न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी केलेल्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.
विधान परिषदेवर बिनविरोध होताच झिशान सिद्धीकी यांची पहिली मोठी प्रतिक्रिया
या घटनेनंतर अमन यांच्या वडिलांनी केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. यात कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाचा अँगल समोर येत आहे.
अमन कुमार शर्मा यांचा पुण्याशी जवळचा संबंध होता. त्यांनी २०१८ मध्ये पुणे येथील नामांकित सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते.
गॅस सिलिंडरच्या दरात एकाच दिवसात 993 रुपयांची वाढ; राहुल गांधीं
अभ्यासात हुशार असलेल्या अमन यांनी १९ जून २०२१ रोजी दिल्ली न्यायिक सेवेत प्रवेश केला. आपल्या अल्प कारकीर्दीत त्यांनी अनेक दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ऑक्टोबर २०२५ पासून ते कडकडडूमा न्यायालयात उत्तर-पूर्व जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाचे पूर्णवेळ सचिव म्हणून कार्यरत होते.
निवडणूक संपताच महागाईचा भडका, LPG सिलेंडरच्या दरात 1000 रुपयांची वाढ
अमन यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे प्रचंड तणावात होते. अमन यांची पत्नीदेखील ज्युडिशियल ऑफिसर आहे,
मात्र घरच्या निर्णयांमध्ये तिचाच वरचष्मा असायचा. अमन यांच्या पत्नीची बहीण म्हणजेच त्यांची मेहुणी जम्मूमध्ये IAS अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
एकनाथ शिंदे वाचाळवीर मंत्र्यांना देणार डच्चू ?
घरचे सर्व निर्णय तिच्याच मर्जीने होत असत आणि तिचेच हुकूम चालत, ज्यामुळे अमन स्वतःला असहाय समजत होते, असा आरोप वडिलांनी केला आहे.
मृत्यूच्या काही तास आधी अमन यांनी वडिलांना फोन करून “जगणं कठीण झालंय” असं सांगितलं होतं. वडील तातडीने अलवरहून दिल्लीला पोहोचले,
उमेदवारी न मिळाल्याने अजितदादांचा निकटवर्तीय राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत
तेव्हा घरात पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. काही वेळाने अमन बाथरूममध्ये गेले, तिथे त्यांनी पत्नीच्या ओढणीने गळफास लावून आयुष्य संपवलं.
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, वडिलांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.







