राजीनाम्याच्या मागणीवर मंत्री धनंजय मुंडे यांचे दिल्लीत मोठे विधान ,म्हणाले.. .
Minister Dhananjay Munde's big statement in Delhi on the demand for resignation, said...
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
देशमुख यांची हत्या होऊन आता ५१ दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुरावे सादर केले असल्याचा दावा केला होता.
तसेच आज धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती. यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत असताना धनंजय मुंडे राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा.
मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगू शकतील. ५१ दिवसांपासून मला लक्ष्य केले जात आहे.” नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतःहून राजीनामा देणार का?
असा प्रश्नही यावेळी मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर मुंडे म्हणाले, “माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे. मी जे बोलतो, ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो. मी नैतिकदृष्ट्या दोषी नाही, असे मला वाटते. जर दोषी असेल तर माझे वरिष्ठ मला तसे सांगतील.”
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली.
त्या म्हणाल्या, “आमच्या सरकारच्या काळात अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ यांना केवळ ऐकीव माहितीवर अटक केली होती.
वर्ष-वर्ष ते तुरुंगात होते. आतातर सत्तेत असलेले आमदारही टीव्हीवर रोज पुरावे देत असतानाही राजीनामा दिला जात नाही.
माझ्यामुळे जर ५० दिवस पक्षाची रोज बदनामी होत असती तर मी स्वतःहून राजीनामा दिला असता. मी पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका घेतली नसती.
दरम्यान बीड विधानसभेचे आमदार आणि एकेकाळचे धनंजय मुंडे सहकारी संदीप क्षीरसागर यांनी दावा केला की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही.
संदीप क्षीरसागर यांनी याबद्दल एक्सवर पोस्ट टाकली. त्यात ते म्हणाले, “वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे खास आहेत. त्यामुळे राजीनामा अशक्य आहे. अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी राजीनामा अशक्य आहे”
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या सीआयडी, विशेष चौकशी पथक आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी चालू आहे. अद्याप या चौकशीत कोणाच्या सहभागाबाबत ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही.
कोणी मागणी केली म्हणून लगेचच राजीनामा घेतला जाणार नाही. पुरावे असल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा फेटाळून लावली.
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून मुंडे यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच वाल्मिकने बीडमध्ये दहशत पसरवली असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत.
अनेक आमदारांनी वाल्मिक कराडवर कारवाई करण्याची आणि धनंजय मुडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. यावर अजित पवारांनी मंगळवारी (२८ जानेवारी) आपली प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांनी आतापर्यंत अनेक वेळा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. मंगळवारी त्याची पुनरावृत्ती झाली.
विरोधक एका बाजूला कराड व मुंडेंविरोधात आरोप करत असताना दुसऱ्या बाजूला वेगवेगळे कथित पुरावे सादर करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पीडित देशमुख कुटुंबाची मागणी लावून धरली आहे.
अशातच त्यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत या हत्याकांड प्रकरणातील काही मुद्दे अजित पवारांसमोर मांडले व मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
मात्र अजित पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे की अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे.
संदीप क्षीरसागर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे खास आहेत.
त्यामुळे राजीनामा अशक्य आहे. अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी राजीनामा अशक्य आहे”. दरम्यान, क्षीरसागर
यांच्या या पोस्टवर दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आता अगदी स्पष्ट झाले आहे. यांना मित्राला वाचवायचे आहे. त्या मित्राने जनतेला चिरडले तरी चालेल”.