ST’s Flexi Fare Scheme;एसटी ची फ्लेक्सी फेअर योजना ;आता प्रवाशांना कमी गर्दीत कमी भाडे

ST's Flexi Fare Scheme; Now passengers get lower fares in less crowded conditions

 

 

 

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवास करताना आता प्रवाशांना कमी गर्दीत कमी भाडे देण्याची मुभा मिळणार आहे. महामंडळाकडून प्रवाशांसाठी ‘लवचिक भाडे’ (फ्लेक्सी फेअर) योजना लागू करण्यात येणार आहे.

 

याअंतर्गत कमी गर्दी असलेल्या महिन्यात प्रवासीसंख्या वाढवण्यासाठी सुमारे १५ टक्क्यांपर्यंत तिकीट दर कमी करण्यात येणार आहेत. सुट्ट्यांच्या कालावधीत म्हणजेच गर्दीच्या हंगामात तिकीट दर सारखेच असणार आहेत.

हे सुद्धा वाचा…. !BREAKING NEWS;मान्सून च्या पहिल्या आठवड्यातच धरणातून पाणी सोडण्याचा मोठा निर्णय;सतर्कतेचा इशारा

एसटी महामंडळाचा आज, रविवारी ७७ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या नियोजनात महामंडळाने महसूलवाढीसाठी ही योजना लागू करण्याची तयारी सुरू केली होती.

हे सुद्धा वाचा…. !ज्योती मल्होत्रानंतर पुन्हा तिघां गुप्तहेराना महाराष्ट्रात अटक

जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च हा सहा महिन्यांचा काळ साधारण कमी प्रवासी गर्दीचा असतो. प्रवासी कमी असले तरी खर्च सारखाच होतो.

 

यामुळे प्रवासी संख्या वाढवण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत आहे.

हे सुद्धा वाचा…. !The most expensive flat in the country;बापरे … ! मुंबईतील फ्लॅट विकला 639 कोटींना;पाहा काय आहे यात खासबात

या योजनेनुसार सामान्यतः ई-शिवनेरी बसचे दादर ते स्वारगेट तिकीट दर ६०० रुपये आहे. कमी गर्दीच्या हंगामात या मार्गाचे आगाऊ आरक्षण केल्यास सवलतीमध्ये हे तिकीट ५१० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल. एसटीचा सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्हता लक्षात घेता प्रवासी एसटीकडे वळेल.

 

राज्यात खासगी बसचालक – मालक कमी गर्दीच्या काळामध्ये खासगी ट्रॅव्हल्सचे दर कमी करतात. खासगी बससाठी भाव कमी करण्यासाठी मुभा प्रवाशांना असते.

हे सुद्धा वाचा…. !Will Dhananjay Munde retire from politics?;धनंजय मुंडे यांनी घेतला मन:शांतीचा निर्णय

त्यामुळे प्रवासी एसटीच्या तुलनेत खासगीने प्रवास करतो. हा प्रवासी वर्ग पुन्हा एसटीकडे आणण्यासाठी महामंडळाची योजना फायदेशीर ठरणारी असल्याचे वरिष्ठ एसटी अधिकारी सांगतात.

 

एसटी प्रवासासाठी लवचिक भाडे योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यावर आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *