‘ईद -ए-मिलादुन नबी’च्या सुट्टीत बदल 5 सप्टेंबर 2025 ऐवजी सोमवारी 8 सप्टेंबरला

Eid-e-Miladun Nabi holiday changed from September 5, 2025 to Monday, September 8

 

 

ईद-ए-मिलादची शुक्रवारची सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. शुक्रवारची सुट्टी सोमवारी देण्यात येणार आहे.

 

गणपती विसर्जनामुळे मुस्लिम समुदायाने सोमवारी 8 सप्टेंबर 2025 रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारची सुट्टी, सोमवारी देण्यात येणार आहे.

OBC नेते आक्रमक,मराठा आरक्षणाचा GR फाडला

मात्र हा निर्णय फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगरापुरता मर्यादित आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी 5 सप्टेंबर 2025 ची सुट्टी कायम ठेवणार असल्याचंही पत्रातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्ट्यांपैकी ई-ए-मिलादची सुट्टी शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी दर्शवली आहे.

पाहा;VIDEO डीएसपी अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कॉल,त्यांना ओळखलेच नाही.

मुस्लिमांचा धार्मिक सण ई-ए-मिलाद हा मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो. यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

 

शनिवारी 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने राज्यात बंधुता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी 21 ऑगस्ट 2025 रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत मुस्लिम समुदायाने सोमवारी 8 सप्टेंबर 2025 रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार दिनांक 8 मे 1968 च्या उक्त अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संलेख अधिनियम 1881 च्या कलम 25 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करुन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी 5 सप्टेंबर 2025 ऐवजी सोमवारी 8 सप्टेंबर 2025 हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

मराठवाड्यातील माजी जिल्हा परिषद सदस्यावर बलात्काराचा गुन्हा

आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर जिव्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवारी 5 सप्टेंबर 2025 ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.

 

5 सप्टेंबरची सुट्टी 8 सप्टेंबर देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात आली होती. ‘ईद -ए-मिलादुन नबी’चे जुलूस 8 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याने या दिवशी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी,

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा , लवकरच काहीतरी मोठं घडेल

अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

 

6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी राज्यभर श्रीगणेश विसर्जन आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी मुस्लीम समाजासाठी पवित्र असलेला ‘मोहम्मद पैगंबर’ यांचा जन्मदिवस आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या मोठा दावा म्हणाले जरांगे पाटलांची फसवणूक

या दिवशी जुलूस काढला जातो. या शोभायात्रेला ‘ईद -ए-मिलादुन नबी’चा जुलूस असं म्हणतात. मात्र हिंदू-मुस्लीम एकोप्याच्या दुष्टीने अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी हा जुलूस काढण्याऐवजी हा जुलूस सोमवारी काढला जाणार आहे. त्यामुळेच सोमवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती.

 

Related Articles