सुधा मूर्ती यांना होतोय सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाचा त्रास
Sudha Murthy is facing problems with the socio-economic survey

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी-लेखिका सुधा मूर्ती यांनी एका सर्वेक्षणात सहभागी होण्यास नकार दिला. मागासवर्गीय आयोगाकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक-शैक्षणिक सर्वेक्षणात सहभागी होणार नाही,
मतदार यादीतून चक्क 19 गावं गायब
असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या निर्णयामुळे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाबद्दल वाद निर्माण झाला आहे. या सर्वेक्षणांबाबत नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलंय.
राज ठाकरे म्हणाले ‘मतदार यादी गोपनीय का?आयोग लपाछपी का करतंय ?
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सर्वेक्षण करणारं पथक त्यांच्या घरी पोहोचलं होतं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे त्यास नकार दिला. “आम्हाला आमच्या घरी हे सर्वेक्षण करायचं नाही”, असं त्यांनी पथकाला सांगितलं. हे सर्वेक्षण आमच्यासाठी उपयुक्त नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही कोणत्याही मागास समुदायात मोडत नाही. त्यामुळे अशा गटांसाठी सरकारकडून होणाऱ्या सर्वेक्षणात आम्ही सहभागी होऊ उच्छित नाही, असं ते म्हणाले. इतकंच नव्हे तर सुधा मूर्ती यांनी सर्वेक्षकांच्या फॉर्मवर स्वाक्षरीसुद्धा केली.
जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप,मतदारांची नावे ठेवण्यासाठी हिरवा पेन, नावं काढण्यासाठी लाल पेन
त्यात त्यांनी लिहिलं, ‘आम्ही कोणत्याही मागासलेल्या समुदायाचे नाही. त्यामुळे आम्ही या सर्वेक्षणात भाग घेणार नाही. त्याचप्रमाणे अशा सर्वेक्षणाचं सरकारसाठी कोणतंही महत्त्व किंवा उपयोग नाही.’
नारायण आणि सुधा मूर्ती यांनी सर्वेक्षणात सहभागी न होण्याच्या त्यांच्या निर्णयाबाबत एक औपचारिक पत्रही जाहीर केलंय. यामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या सर्वेक्षणातून बाहेर पडण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाचा OBC आरक्षण प्रकरणात मोठा निर्णय
त्यामुळे सरकारद्वारे सर्वेक्षणाच्या आधारे जो सामाजिक आणि आर्थिक डेटा गोळा केला जातो, त्याबद्दल मूर्ती दाम्पत्य सहमत नसल्याचं त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होतं.
मागासवर्गीय आयोगाकडून देशातील विविध समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी, त्यानुसार धोरणं ठरवण्यासाठी सर्वेक्षण केलं जातं.
नरेंद्र मोदी यांचे ट्रम्प यांना आश्वासन, राहुल गांधी म्हणाले नरेंद्र मोदी घाबरले
सामाजिक न्याय सुनिश्चित करणं आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना विकसित करणं, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. परंतु नारायण मूर्ती
आणि सुधा मूर्ती यांनी थेट या सर्वेक्षणातच भाग घेण्यास नकार दिल्याने त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती हे देशातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत









