उद्धव ठाकरेंच्या कुटूंबांचे नाव मतदार यादीतून हटविण्याचा प्रयत्न
Attempt to remove Uddhav Thackeray's family name from voter list

महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी संयुक्तपणे शनिवारी मुंबईत निवडणूक आयोगाविरुद्ध “सत्याचा मोर्चा” आयोजित केला.
घरातून बाहेर पडू नका ,राज्यावर भलंमोठं संकट
या मोर्चाचा उद्देश मतदार यादीतील कथित अनियमितता आणि डुप्लिकेट मतदारांच्या मुद्द्याकडे सरकार आणि आयोगाचे लक्ष वेधले आहे.
चर्चगेट येथील एका रॅलीत बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपला “अनाकोंडा” म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण आता अनाकोंडा थांबवला पाहिजे.
मंदिरात चेंगराचेंगरी 10 भाविकांचा मृत्यू
अन्यथा, हे लोक सुधारणार नाहीत. पुरावे दररोज समोर येत आहेत. तरीही, सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोग गप्प आहेत. त्यांनी आमचा पक्ष चोरला,
आमचे नाव चोरले, आमचे निवडणूक चिन्ह चोरले. माझ्या वडिलांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते थांबवले नाही, म्हणून आता ते मते चोरत आहेत.”
“दररोज कुठून ना कुठून नवे पुरावे समोर येत आहेत. मी ‘ॲनाकोंडा’ म्हणतोय ते विनोदाने नाही. यांची भूक शमतच नाही — पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं,
सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवा ;शरद पवारांचा एल्गार
आता माझे वडिलसुद्धा चोरायचा प्रयत्न करत आहेत. आणि तेही पुरेसे नाही म्हणून आता मत चोरायला लागले आहेत,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील वक्तव्यावर टीका करत ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणाले की लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात विरोधकांनी फायदा घेतला याचा पर्दाफाश करणार आहेत.
मी त्यांना आव्हान देतो, करा पर्दाफाश! पण जेव्हा मुख्यमंत्रीच अशा प्रकारे बोलतात, तेव्हा याचा अर्थ त्यांनी स्वतः मान्य केलं आहे की मतचोरी झाली आहे, आणि होत आहे.”
उद्धव ठाकरे यांनी आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावरून मतदार यादीतील नावे हटवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ठाकरे म्हणाले,
“मतदार यादीतील नाव पडताळणीसाठी माझ्या नावाने ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे. हा अर्ज २३ तारखेला ‘सक्षम’ नावाच्या अॅपवरून दाखल करण्यात आला.
याचा अर्थ माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी मागवण्याचा आणि माहिती हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. माझ्यासकट कुटुंबातील चार जणांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा डाव रचला गेला असावा,” असा संशय ठाकरे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “या प्रकरणात आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबला असून सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयात तरी न्याय मिळतो की नाही,
याची देखील ही एक परीक्षा असेल. निवडणूक आयुक्त लाचार झाले आहेत. शिवसेनेची केस सर्वोच्च न्यायालयात तीन-चार वर्षांपासून सुरू आहे.
बच्चू कडूंचे आंदोलन चिघळले ,हायकोर्टाचे आदेश आंदोलनस्थळ रिकामे करा
आम्हाला न्याय मिळेल, अशी खात्री आहे. पण अखेर जनतेचं न्यायालय मतचोरांचा निकाल लावेल,” असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
मतदान चोरीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देतोयच, पण आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनेही जागं झालं पाहिजे.
त्यामुळे मतचोर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला फटकवा असं उद्धव ठाकरे म्हणाले. बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत,
आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे असंही ते म्हणाले. मनसे आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत निवडणूक आयोगाच्या मतदारयादीतील भ्रष्टाचाराविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी लोकांना जागृत राहण्याचं आवाहन केलं.
आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे. त्यामुळे हे जे काही चाललं आहे थांबवलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आज एवढे सगळे धडधडीत पुरावे दाखवले, तरीही निवडणूक आयोग त्यावर काहीही कारवाई करत नाही. आपले पक्ष चोरले, नाव चोरले… तेवढंही पुरेसं नाही म्हणून आता मतदारही चोरले जात आहेत.
महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, आजही महाराष्ट्र एकवटला आहे. ज्या गोष्टी आता आम्ही विरोधी पक्ष करत आहोत, तसंच सगळ्या मतदारांनीही जागृत व्हावं आणि मतदार याद्या तपासा. आपलं नाव त्यामध्ये आहे की नाही हे तपासा आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर तुम्हाला माहिती नसलेले किती मतदार आहेत ते तपासा.
उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा नावाने एक ऑनलाईन अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आला. घरातील मतदार रद्द करण्यासाठी त्याने अर्ज केला होता. तो अर्जही बोगस आणि मोबाईल नंबरही खोटा असल्याचं उघड झालं.
त्यावर निवडणूक आयोगाने आमच्याकडे येऊन त्याची खातरजमा केली. माझ्या नावाने खोट्या नंबरने ओटीपी करण्याचा प्रयत्न केला गेला, तो 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. यामागे काही षडयंत्र आहे का हे तपासावं लागेल.
आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे. त्यामुळे हे जे काही चाललं आहे थांबवलं पाहिजे.
या सगळ्याचे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निवडणूक आयोग तर लाचार झालाच आहे, पण आता न्यायालय काय करतंय ते पाहू. न्यायालय आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे. आम्ही पुढे जात असताना तुमची साथ हवी आहे.
लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदार घुसवण्यात आले आणि मतदान घेण्यात आलं. मग जो खरा मतदार दुपारी उन्हात उभारून मतदान करतो त्याच्या मताला काही किंमत आहे की नाही?
मतदार घरोघरी जाऊन तपासा, त्या ठिकाणी जर दुबार तिबार मतदार सापडले तर त्यांना तिथेच फोडून काढा. त्यांना बडव बडव बडवायचं आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत.
कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार?
मुंबई उत्तर पूर्व 92,983 दुबार मतदार
उत्तर मध्ये 63,740 दुबार मतदार
दक्षिण मध्ये 50,565 मतदार
दक्षिण मुंबई 55,205 दुबार मतदार
नाशिक लोकसभा 99,673 दुबार मतदार
मावळ 1,45,636 दुबार मतदार








