सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवा ;शरद पवारांचा एल्गार

Stop the ongoing vote theft; Sharad Pawar's appeal

 

मंदिरात चेंगराचेंगरी 10 भाविकांचा मृत्यू

विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले, ते पाहता संसदीय लोकशाहीला धक्का बसला आहे. लोकशाहीसाठी आपल्याला एक व्हावं लागेल.

 

आपण सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवूया. सगळेजण एक होऊया, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारयांनी केले.

घरातून बाहेर पडू नका ,राज्यावर भलंमोठं संकट

मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात ‘सत्याचा मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातून शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, आजचा मोर्चा हा जुन्या गोष्टींची आठवण करून देत आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी मोर्चे निघाले होते. काळा घोडा आणि त्या परिसरात आंदोलन पार पाडलं.

हवामान विभागाकडून मोठा इशारा

आज तुम्ही जशी एकजूट दाखवली. त्यावेळी देखील अशीच एकजूट पाहिला मिळाली होती. लोकशाहीमध्ये संविधानाने जे अधिकार दिले आहेत, त्यानुसार आपण लढत आहोत.

 

विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले, त्यावेळी संसदीय लोकशाहीला धक्का बसल्याचे समोर आले. उत्तमराव जानकर यांनी काही बाबी सांगितल्या.

 

सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे देखील सांगितले. राजकीय मतभेद असू शकतात. परंतु, आता हे विसरून आपल्याला एक व्हावं लागेल. लोकशाहीत आपण मताचा अधिकार जतन केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

 

हवामान विभागाकडून मोठा इशारा
शरद पवार पुढे म्हणाले की, काही ठिकाणी तक्रारी झाल्या. बनावट आधारकार्ड केले जात आहेत. ते म्हणाले पुरावे दाखवा. हे आरोप सिद्ध करणारा डेमो ज्या व्यक्तीने दाखवला, त्याच्यावरच आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जे पुरावे देतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी विचारधारा वेगळी असली तरी अनेक पक्ष सहभागी झाले आहेत.

 

लोकशाहीसाठी आपल्याला एक व्हावं लागेल. आपण सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवूया. सगळेजण एक होऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बच्चू कडूंचे आंदोलन चिघळले ,हायकोर्टाचे आदेश आंदोलनस्थळ रिकामे करा

सत्याच्या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत. आम्ही बोलतोय, भाजपचे लोक बोलताय,

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील लोक बोलताय. मग निवडणुका घ्यायची घाई का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्या साफ करा, पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचं, हे स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले.

लाडक्या बहिणींच्या E KYC ची मुदत संपणार,शेवटची संधी

यावेळी राज ठाकरेंनी सभेत दुबार मतदारांचा पुरावा देखील दिला. आज मी इकडे पुरावा घेऊन आलो आहे. दुबार मतदारांना घेऊन आलोय, असं म्हणत राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या याद्यांच्या कागदपत्रांचा डोंगर दाखवला.

 

जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर काम करा, प्रत्येक चेहरा समाजाला पाहिजे. दुबार-तिबार तिथे आले, तर तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या, असा सूचना देखील राज ठाकरेंनी दिल्या.

 

 

Related Articles