जगाचा अंत जवळ आला? पैगंबरांची ‘ती’ भविष्यवाणी पुन्हा जिवंत;पाहा VIDEO
Is the end of the world near? The prophet's 'that' prophecy has come alive again; watch the VIDEO.

उत्तर सौदी अरेबियातील ताबुक आणि अल-जौफ प्रांतात विक्रमी बर्फवृष्टी झाली असून वाळवंटावर पांढरी चादर पसरली आहे.
या घटनेचा संबंध पैगंबर मुहम्मद सलल्लाहू अलैवस्सलंम यांच्या एका जुन्या भविष्यवाणीशी लावला जात असून ‘जगाचा अंत’ जवळ आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते हा हवामान बदलाचा परिणाम असला तरी, भाविकांसाठी हा एक मोठा धार्मिक संकेत मानला जात आहे.
सौदी अरेबिया म्हणजे डोळ्यासमोर येते ते अथांग वाळवंट आणि अंगाची लाहीलाही करणारा सूर्यप्रकाश. पण सध्या या वाळवंटाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.
अमेरिकेत या 39 देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर बंदी
उत्तर सौदी अरेबियातील ताबुक आणि जबल अल-लॉज या पर्वतीय भागात निसर्गाचा एक अजब चमत्कार पाहायला मिळत आहे. या भागात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे डोंगरदऱ्या बर्फाखाली गाडल्या गेल्या आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जगभरात व्हायरल होत आहेत
काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी आणि सौदी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भागात तापमानाचा पारा उणे ४ अंशांच्या खाली गेला आहे. ट्रोजाना हाईलँड्स आणि ताबुकच्या परिसरात केवळ बर्फच पडला नाही,
तर मुसळधार पावसाने ओढे-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसामुळे वाळवंटातील कोरड्या जमिनीला ओलावा मिळाला असून तिथे हिरवळ उगवू लागली आहे. हे दृश्य स्थानिक लोकांसाठी जितके आनंददायी आहे, तितकेच ते जगासाठी चिंतेचे आणि कुतूहलाचे कारण ठरले आहे.
फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, संजय राऊतांचा कुणाला इशारा?
सोशल मीडियावर या बर्फवृष्टीचा संबंध थेट इस्लाम धर्मातील पैगंबर मुहम्मद सलल्लाहू अलैवस्सलंम यांच्या भविष्यवाणीशी लावला जात आहे. एका हदीसनुसार , पैगंबरांनी म्हटले होते की
, “जोपर्यंत अरबी द्वीपकल्प पुन्हा एकदा कुरणे आणि नद्यांनी भरलेला होत नाही, तोपर्यंत कयामत (जगाचा अंत) येणार नाही.” सौदीत वाढलेला पाऊस,
आता विमानाचा हा नियम ट्रेनसाठी देखील लागू,रेल्वेचा प्रवाशांना मोठा दणका
बर्फवृष्टी आणि त्यामुळे वाळवंटात वाढणारी हिरवळ हे या भविष्यवाणीच्या दिशेने पडलेले पाऊल असल्याचे अनेक मुस्लीम बांधव मानत आहेत. त्यांच्या मते, निसर्गातील हा बदल ‘अंतिम काळ’ जवळ आल्याचा संकेत आहे.
दुसरीकडे, हवामान तज्ज्ञ या बदलाकडे जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून पाहत आहेत. भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि हवेतील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही बर्फवृष्टी होत आहे.
जर अशाच प्रकारे पाऊस आणि बर्फवृष्टी होत राहिली, तर सौदी अरेबियाचे कृषी क्षेत्र पूर्णपणे बदलू शकते. सौदी ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत तिथे आधीच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जात आहे.
हवामान विभागाने दिला मोठा इशारा;7 राज्यात अलर्ट, मोठं संकट, हाय अलर्ट जारी
धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक बदल या दोन्हींच्या केंद्रस्थानी सध्या सौदी अरेबिया आले असून, हा बदल जगासाठी शुभ ठरेल की अशुभ, हे काळच ठरवेल.
❄️ Aerial view of snowfall covering Jabal Al-Lawz, northwest of Tabuk 🇸🇦
Captured on December 17, 2025, showcasing one of Saudi Arabia’s most breathtaking winter scenes.🎥 Aerial footage: Abdul Salam Al-Sharif
Nature at its finest in the Kingdom. ❄️✨#SaudiTimes #JabalAlLawz… pic.twitter.com/9oo01VbTLD
— Saudi Times (@sauditimes_en) December 18, 2025
First snowfall of year blanketed high altitude regions of Saudi Arabia this week as temperatures dropped sharply, creating rare winter scenes across elevated areas pic.twitter.com/S2opHXCPcz
— Daily Sabah (@DailySabah) December 18, 2025








