रोहित पवार आक्रमक;पोहोचले थेट ठाण्यात पण पोलिसांचा FIR दाखल करण्यास नकार
Rohit Pawar aggressive; reached directly to the police station but the police refused to file an FIR

आमदार रोहित पवार हे अजितदादांच्या विमान अपघात की घातपात याविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी DGCA, सीआयडी, विमान वाहतूक मंत्र्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
VSR कंपनीला वाचवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाप्रकरणी रोहित पवार यांनी DGCA विरोधात तक्रार करण्याची मागणी केली.
ते थेट मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी आणि आमदार संदीप क्षीरसागर हे पण उपस्थित होते.
यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी आणि त्यांच्यात मोठा वाद पेटला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, अजितदादांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी, आ. नाईकवडी आणि अनेक पदाधिकारी त्यांच्या सोबत होते.
एफआयआर आज का करण्याचा निर्णय घेतला याची माहिती त्यांनी दिली. डीजीसीएने एक परिपत्रक काढलं. व्हीएसआर कंपनीच्या २५ पैकी ५ विमान थांबवण्याचा आदेश दिले.
व्हीएसआर कंपनी विमान अपघाताला कारणीभूत असल्याचे अप्रत्यक्ष समोर आले. त्याआधारे आम्ही एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. नवीन फौजदारी कायद्याच्या आधारे आम्ही गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. त्यावेळी अधिकार्यांशी वाद झाला.
अजितदादांच्या विमान अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाला. ही सर्व घटना आता सर्वांना माहिती आहे. एफआयआर करताना एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी वाद झाला.
त्यावेळी कनिष्ठ अधिकाऱ्याने हुज्जत घातली. एफआयआर नोंदवायला सुरुवात झाली होती. माझं स्टेटमेंट नोंदवायला सुरूवात झाली तेव्हाच एका मोठी अधिकारी तिथे आले.
डीसीपी तिथे आले, ते म्हणाले गुन्हा नोंदवण्यात येणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही एफआयआर दाखल करून घेऊ शकत नाही.
तुम्हाला कुणाला सांगायचे ते सांगा आम्ही गुन्हा नोंदवणार नसल्याचे अधिकारी म्हणाले. मग त्यांना कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला असा सवाल रोहित पवार यांनी केला.
पाठिंबा असल्याशिवाय अधिकारी अशी मग्रुरी करू शकत नाही असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. मारामारी झाली तरी गुन्हा नोंदवल्या जातो, काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्ट काढले तर एफआयआर नोंदवला जातो.
अजितदादांचा मृत्यू झाला. घात की अपघात याविषयी आम्ही शंका व्यक्त करत आहे. मग अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा नियम का, असा सवाल त्यांनी केला.
मरीन ड्राईव्ह पोलीस एफआयआर नोंदवत नाही, आता बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न करू, उद्या सकाळी 10 वाजता पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.
एफआयआर करण्यापासून आम्हाला का रोखल्या जात आहे असा सवाल रोहित पवारांनी केला. या राज्यात अजितदादांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना कसा न्याय मिळेल.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय सत्रात जाऊन घसा कोरडा होईपर्यंत कशी मागणी करणार, इथं एफआयआरचं नोंदवला जात नाही असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केला.
दरम्यान रोहित पवार यांनी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याचा दावा केला. तर पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनावरही त्यांनी आक्षेप नोंदवला.
पोलीस उर्मटपणे वागल्याचे आणि त्यांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचे रोहित पवार म्हणाले. तर याविषयावर पोलीसांची बाजू समोर आली आहे.
रोहित पवार यांनी दिलेली तक्रार स्वीकारली आहे. तपासून योग्य ती कार्यवाही करू असे मुंबई पोलिसांनी कळवल्याचे समजते.







