राहुल गांधींचा शब्द खरा ठरला ,अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची ‘तात्पुरती परवानगी
Rahul Gandhi's words came true, US gives India 30-day 'temporary' permission to buy Russian oil

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शिंदेंनी दिली कबुली, इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, परराष्ट्र धोरणाची सध्याची स्थिती “एका तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम आहे.” त्यांनी पश्चिम आशियातील युद्ध
आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबद्दल ही टिप्पणी केली. राहुल गांधी यांनी संसदेत 11 फेब्रुवारी रोजी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी तेल खरेदीवरून अमेरिकेकडून सुरु असलेल्या मुस्कटदाबीवर जोरदार हल्ला चढवला होता.
राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट टळले, आता उकाडा वाढणार
राहुल गांधी यांनी X वर म्हटलं आहे की, “भारताचे परराष्ट्र धोरण आपल्या लोकांच्या सामूहिक इच्छेने आकारले जाते. ते आपल्या इतिहासात,
आपल्या भूगोलात आणि सत्य आणि अहिंसेवर आधारित आपल्या आध्यात्मिक नीतिमत्तेत रुजले पाहिजे.” त्यांनी आरोप केला, “आज आपण जे पाहत आहोत ते धोरण नाही. ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचे परिणाम आहे.”
11 फेब्रुवारी रोजी राहुल यांनी आता अमेरिका ठरवणार की आम्ही कोणाकडून तेल खरेदी करतो. अमेरिका आमच्याकडे येईल आणि म्हणेल की तुम्ही यांच्याकडून, त्यांच्याकडून किंवा आणि कोणाकडून तेल खरेदी करू शकत नाही.
राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य
रशिया, इराण, त्यांना कोणाकडून हवे ते ठरवतील. आमचे पंतप्रधान निर्णय घेणार नाहीत. ते निरीक्षण करतील. ते लक्ष ठेवतील,
म्हणजे ते पाहतील आणि जर भारत त्यांना नको असलेल्या कोणाकडून तेल खरेदी करेल तर ते आम्हाला शिक्षा करतील. दरम्यान,
एक दिवस आधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारताला आलेल्या अडचणींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
शिंदेंनी दिली कबुली, इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता
राहुल गांधींनी सोशल मीडिया X वर पोस्ट केले, “जग एका अस्थिर टप्प्यात प्रवेश करत आहे. एक भयानक संकट पुढे येत आहे.” भारताचा तेल पुरवठा धोक्यात आहे,
कारण आपल्या आयातीपैकी 40 टक्क्यांहून अधिक भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. एलपीजी आणि एलएनजीसाठी परिस्थिती आणखी वाईट आहे.’ राहुल गांधींनी लिहिले की, ‘संघर्ष आपल्या शेजारी पोहोचला आहे;
हिंदी महासागरात एक इराणी युद्धनौका बुडाली आहे. तरीही पंतप्रधानांनी यावर भाष्य केलेले नाही. अशा वेळी आपल्याला स्थिर नेतृत्वाची आवश्यकता आहे. उलट, भारताकडे असे पंतप्रधान आहेत जे तडजोड करत आहेत आणि त्यांनी धोरणात्मक स्वायत्तता सोडली आहे.’
आरोप करणाऱ्या रोहित पवारांवर तटकरेंचा पलटवार
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने भारतीय रिफायनरीजना रशियन तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची परवानगी दिली आहे. ही मुदत 4 एप्रिल २०२६ रोजी संपणार आहे.
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.
आरोप करणाऱ्या रोहित पवारांवर तटकरेंचा पलटवार
‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ हा महत्त्वाचा मार्ग धोक्यात आल्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा प्रवाह सुरळीत राहावा, यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.
ही सवलत सरसकट सर्व रशियन तेलासाठी नाही. जी जहाजे 5 मार्च 2026 पूर्वी रशियातून निघाली होती आणि सध्या समुद्रात अडकली आहेत फक्त त्याच मालाची खरेदी भारताला करता येणार आहे.
इराणच्या धमकीने अमेरिकेला फुटला घाम
अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी स्पष्ट केले की, हा एक ‘शॉर्ट टर्म’ मार्ग आहे. यामुळे रशियाला मोठा आर्थिक फायदा होणार नाही, कारण हे तेल आधीच जहाजांवर चढवण्यात आलेले आहे.
स्कॉट बेसेन्ट यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ऊर्जा धोरणामुळे अमेरिका आता इतिहासातील सर्वाधिक तेल आणि वायू उत्पादन करणारा देश बनला आहे.
भाजपकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांना रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत दिली आहे.
हा निर्णय जाणीवपूर्वक अतिशय कमी कालावधीसाठी घेण्यात आला आहे, जेणेकरून रशियाला याचा मोठा आर्थिक फायदा होणार नाही. ही सवलत केवळ अशाच रशियन तेलासाठी आहे, जे सध्या समुद्रात जहाजांवर अडकून पडले आहे.
राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन
स्कॉट बेसेन्ट यांनी पुढे म्हटलं आहे की, भारत हा अमेरिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, भारत आता अमेरिकेकडून होणारी तेल खरेदी वाढवेल.
इराणने जागतिक ऊर्जा पुरवठ्याला ‘ओलीस’ ठेवण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यातून निर्माण झालेला दबाव कमी करण्यासाठी ही एक तात्पुरती व्यवस्था आहे.”
20 आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला,अजित पवारांच्या घातपाताचा संशय
https://x.com/i/status/2029788091943420173
https://x.com/i/status/2029788091943420173
https://x.com/i/status/2029788091943420173







