नदीत नाव उलटून १० जणांचा मृत्यू;पाहा VIDEO
10 Dead After Boat Capsizes in River; Watch Video

मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी पर्यटकांनी भरलेली एक नाव यमुना नदीत उलटल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. नौकेतील सर्व पर्यटक हे पंजाबमधील आहेत.
महसूल अधिकाऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नदीच्या मध्यभागी नाव हेलकावे घेऊ लागली. वाऱ्याच्या वेगामुळे नावेचा वेग अनियंत्रित झाला आणि ती एका पँटून पुलाला जाऊन धडकली. या धडकेमुळे नाव उलटून अपघात घडला.
#WATCH मथुरा, उत्तर प्रदेश: मथुरा में यमुना नदी में नाव पलटने की घटना में अब तक 10 लोगों की मौत हो चुकी है। बचाव अभियान जारी है। pic.twitter.com/CNr4G4mqrb
— ANI_HindiNews (@AHindinews) April 10, 2026
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह हाती आले असून १६-१७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि सुमारे ५० स्थानिक पाणबुडे घटनास्थळी कार्यरत आहेत. स्थानिक पाणबुडे ‘गुलाब’ याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने स्वतः आतापर्यंत १५ जणांना पाण्याबाहेर काढण्यास मदत केली आहे.
भाजप सत्तेतल्या मित्रांचीच शिकार करणार ;बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नदीच्या खोल भागात बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन संयुक्तपणे हे मदतकार्य राबवत आहेत.
दुखद खबर : मथुरा वृंदावन मे यमुना नदी मे स्टीमर पलटने से बड़ा हादसा,
10 लोगों के मौत की हो गयी, स्टीमर मे 25 लोग सवार थेRescue operation जारी है
ओम शांति | Om Shanti#Mathura #Yamuna #Steamboat #Steamer pic.twitter.com/zNMsUWrsqS
— Kamalraj Singh (@kamalrajsingh_) April 10, 2026









