ईडीची नोटीस मिळताच व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

As soon as the ED notice was received, the trader took an extreme step

 

 

 

 

सक्तवसुली संचालनालयाची नोटीस आल्यानंतर काही दिवसातच व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. झारखंडमधील एका जमीन व्यावसायिकाला ईडीने नोटीस पाठवली होती.

 

 

 

त्यानंतर व्यावसायिकाने रांचीत गळफास घेत आत्महत्या केली. जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने व्यावसायिकाला नोटीस पाठवली होती. नोटीस मिळाल्यापासून तो तणावात होता, गुरुवारी व्यावसायिकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

 

 

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रांचीतील लालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिल्वर डेल अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

 

 

 

 

कृष्णकांत असं गळफास घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. कुटुंबियांनी कृष्णकांत यांनी गळफास घेतल्याचं समजताच त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं.

 

 

 

मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास केला जात आहे.

 

 

 

 

 

कृष्णकांत यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की, जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी कृष्णकांत यांना नोटीस पाठवली होती.

 

 

 

 

एजन्सीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर कृष्णकांत तणावात होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप जवळच्या नातेवाईकांनी केला आहे.

 

 

 

दरम्यान, कृष्णकांत यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण पोलीस शोधत आहेत.

 

 

 

 

 

केवळ ईडीची नोटीस हे आत्महत्येचं कारण आहे का? की दुसरं काही कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. कृष्णकांत यांच्या संपर्कातील इतर लोकांचीही चौकशी केली जात आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *