परभणी,बीडमध्ये कोणाचा होणार विजय ;काय सांगतो एक्झिट पोल ?
Who will win in Parbhani, Beed; what does the exit poll say?

यंदाच्या लोकसभा निवडणुकांवेळी अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा होती,
त्या महादेव जानकर यांनी ऐनवेळी महायुतीसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे, महादेव जानकर यांना महायुतीकडून एक जागा देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा महादेव जानकर यांना दिली. त्यानुसार, परभणीत मतदारसंघातील रासपचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
त्यामुळे, परभणीत शिवसेनेच्या ठाकरेंचे निष्ठावंत संजय बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्यात थेट सामना रंगला. आता,
लोकसभा निवडणुकांच्या मतदानाची सांगता झाल्यानंतर आज एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली. त्यानुसार, परभणी मतदारसंघात महादेव जानकर यांना धोक्याची घंटा असल्याचे दिसते.
एपीबी सीवोटर आणि विविध माध्यम संस्थांनी आज एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली. त्यापैकी, सी वोटरनुसार महायुतीला 22 ते 26 आणि मविआला 23 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
भाजपाचा 45 जागांचं स्वप्न हे स्वप्नच राहिल्याचं या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. महायुतीतील भाजपा 17, शिंदे गट 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळेल असा अंदाज या एक्झिट पोलनुसार आहे.
तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 काँग्रेस 8, शरद पवार गट 6 आणि अपक्षाला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या विविध पोलच्या अंदाजानुसार परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर पिछाडीवर असल्याचे दिसून येते.
परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव यांच्यात थेट लढत झाली. तर, वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव डख यांनीही निवडणूक लढवली. मात्र, एक्झिट पोलनुसार त्यांचा अंदाज चुकल्याचं दिसून येतंय.
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार परभणीमध्ये ठाकरे गटाचे मविआचे उमेदवार संजय जाधव आघाडीवर. महायुतीचे रासपचे महादेव जानकर पिछाडीवर आहेत.
तर, परभणीजवळील बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे आघाडीवर असल्याचे एक्झिट पोलमधील आकडेवारीवरुन दिसून येते.
2019 च्या परभणी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे बंडू जाधव हे 42 हजार मताधिक्यांनी निवडून आले होते. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर होते.
बंडू जाधव यांना 5.38 लाख मतं होती तर विटेकरांना 4.96 लाख मतं मिळाली. राज्यात झालेल्या चुरशींच्या निवडणुकांपैकी ही एक निवडणूक ठरली होती.
यंदा राजेश विटेकर हे महादेव जानकर यांच्यासाठी प्रचार करत होते. मात्र, येथील मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय संघर्ष पाहायला मिळाला.
स्वत: बंडू जाधव यांनीच याबाबत कबुली दिली. मनोज जरांगे यांचा फायदा मला व बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना झाल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे, मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा बंडू जाधव यांना झाल्याचे बोलले जाते.
शिवसेना फुटीनंतर संजय जाधव हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे, परभणीतून बंडू जाधव यांनात उमेदवारी देण्यात आली.
अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे, त्याचा फायदा निश्चितचपणे त्यांना होऊ शकतो, असं येथील राजकीय तज्ज्ञ सांगतात.
परभणी लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे, हा मतदारसंघ परभणी व जालना ह्या दोन्ही जिल्ह्यांचा आहे.
या शिवाय जिंतूर, परभणी, पाथरी आणि गंगाखेड या 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश परभणी मतदारसंघात आहे. या 6 मतदारसंघांपैकी जिंतूर व परतूर या 2 मतदारसंघात भाजपचे,
गंगाखेड मतदारसंघात रासपचे, घनसांगवीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, पाथरीत काँग्रेसचे आमदार आहेत, तर परभणी मतदारसंघात
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे. म्हणजेच, भाजप वगळता इतर 4 पक्षाचे एक-एक आमदार आहेत. तर महायुतीचे 4 आमदार असल्याचे दिसते.
जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण असलेल्या परभणी जिल्ह्यातून आजही रोजगारासाठी हजारो तरुन स्थलांतर करत आहेत.
त्यामुळे, उद्योगधंदे नसणे, बेरोजगारी आणि दुष्काळ हे मुद्दे मतदारसंघात प्रभावीपणे आहेत. त्यातच, महादेव जानकर यांनी मी परभणीत उद्योगधंदे आणील व शेतकऱ्यांसाठी काम करेल असे आश्वासन दिले होते.
यंदाही कापूस आणि सोयाबीनला भाव मिळवून देण्याचं आश्वासन येथील जनतेला राजकीय नेत्यांनी दिलं आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
महादेव जानकर यांचा माझा लहान भाऊ असा उल्लेख केल्याने जानकर यांचा विजयाचा आत्मविश्वास बळावल्याचं दिसून आलं.
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर आहेत. डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत.
निलेश लंके शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. डॉ. सुजय विखे पाटील महायुतीकडून भाजपाचे उमेदवार आहेत.
बीडमध्ये महायुतीकडून भाजपाच्या पंकजा मुंड उमेदवार आहेत. त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या बजरंग सोनावणे यांच्याबरोबर आहे.
tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर असतील. बजंरग सोनावणे पिछाडीवर आहेत. सोनावणे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत.
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1