अजबच;औषध बिलात सवलत देणा-या मेडिकल चालकाला संघटनेने ठोठावला ५ हजाराचा दंड
Ajbach;Medical giving discounts on medicine bills The association imposed a fine of 5 thousand on the driver
पूर्णा/तौफिक शेख/९९०४४३०२४
मेडिकलवर आलेल्या ग्राहकांना माणुसकीच्या नात्याने औषध बिलात सवलत देणा-या एका औषध विक्रेत्यांस केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने च्या ५ हजाराचा दंड ठोठावला असल्याची चर्चा आहे.
याबाबत माहितीअशी कि, पुर्णा शहरासह तालुक्यातील काही मेडिकल चालक माणुसकीची भावना जोपासत मेडिकलवार आलेल्या ग्राहकांना त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना आपआपल्या परिने थोडीफार बिलात सुट देत होते ,
ही बाब सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या हिताची माणूसकी जपणारी आहे . मात्र केमिस्ट अँड ड्रगीष्ट असोसिएशने या मेडिकलचालकांना टाकावं करत औषध बीलात सवलत देणा-या
एका औषधी विक्रेत्यास युनियनचे नियम डावलल्याचे कारण देत ५ हजार रुपयांचा दंड लावून त्याच्याकडून तो भरून घेतल्याची चर्चा आहे.
असोशिएशनच्या या निर्णयामुळे औषधी विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून,दंड लागेल या भितीने औषध बीलात सवलत देणे मेडिकलचालकांनी बंद केलेआहे.
यामुळे हदय रोग, शुगर ,किडणी आदीं आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना याच आर्थिक फटका बसला आहे.
असोशिएशनच्या दादागिरीची दबक्या आवाजात चर्चा होत आहे