महाराष्ट्रावर धडकणार झोंबणाऱ्या शीत लहरी

Chilling cold waves are set to hit Maharashtra.

 

 

उत्तर भारतातील पर्वतीय भागांसह मैदानी क्षेत्रांमध्येसुद्धा तापमानात घट होण्यास सुरुवात झाल्या कारणानं मध्य भारत आणि महाराष्ट्रापर्यंत थंडीचा प्रभाव पाहायला मिळत आहे.

शरद पवार लवकरच भाजप एनडीए मध्ये येणार ,मंत्र्याच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

थंडीचा कडाका सातत्यानं वाढत असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंशांच्याही खाली उतरला आहे. तर, पुढील 24 तासांसाठी मध्य भारताला थंडीच्या लाटेचा इशारा जारी करत राज्यात ही शीतलहर नेमकी कशा पद्धतीनं तीव्र होत जाईल हेच हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं.

नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

महाराष्ट्रातील प्रामुख्यानं उत्तरेकडील पट्ट्यात धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर इथं थंडीच्या लाटेचा इशारा असून, घाटमाथ्यावर शीतलहरी ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगानं वाहणार असल्यानं हा झोंबणारा वारा अडचणी वाढवू शकतो.

रेल्वेमंत्र्यांनी मानले राहुल गांधींचे आभार, कारण घडले काय?

याशिवाय धुक्याची चादर घाट क्षेत्रासह मैदानी भागांमध्येसुद्धा स्थिरावणार असल्या कारणानं रात्रीच्या वेळी आणि पहाटे दृश्यमानतेवर याचा परिणाम होणार असल्या कारणानं वाहन चालकांना खबरदारी बाळगण्याचा इशाराही यंत्रणांनी जारी केला आहे.

मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, शहरात किमान तापमानाचा आकडा 20 अंशांच्या दरम्यान राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, संजय राऊतांचा कुणाला इशारा?

धुक्याची चादर शहरातही पाहायला मिळणार असून, सायंकाळनंतर सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, पालघर आणि रायगडमध्येसुद्धा हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील.

 

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये थंडीची लाट आणखी तीव्र होत असून सोलापूरपर्यंत हीच स्थिती पाहता येणार आहे. अगदी काश्मीर

महाराष्ट्र सरकार “या” प्रत्येक कुटुंबातील एकाला देणार सरकारी नोकरी देण्याच्या तयारीत

आणि हिमाचलमध्ये वाहणाऱ्या शीतलहरींप्रमाणंच थंडीचा कडाका आता महाराष्ट्रात जाणवणार असल्या कारणानं घराबाहेर पडावं की नाही? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

 

थंडीच्या या वातावरणाला कोकण, मराठवाडा आणि विदर्भसुद्धा अपवाद नसून, नांदेड, परभणी, जालनासह नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावची इथंही किमान तापमान 12 ते 13 अंशांदरम्यान राहणार असून

राज्यावर मोठे संकट, भारतीय हवामान विभागाकडून थंडीचा अलर्ट जारी

शीतलहरी धीम्या गतीनं सबंध महाराष्ट्र व्यापत असून येत्या 48 तासांमध्ये हवामानात फारसे बदल अपेक्षित नसल्याचा अंदाज वर्तवत हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे.

 

 

Related Articles