महाराष्ट्र सरकार “या” प्रत्येक कुटुंबातील एकाला देणार सरकारी नोकरी देण्याच्या तयारीत

Maharashtra government is preparing to give one government job to each of these families

 

 

महाराष्ट्रामध्ये मागील काही आठवड्यांपासून सातत्याने वन्य प्राण्यांकडून खास करुन बिबटे आणि वाघांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा प्रश्न चर्चेत आहे.

पुन्हा धनंजय मुंडें आणि जरांगेमध्ये जुंपली

पुण्याबरोबरच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून बिबट्यांनी मानवी वस्तीत शिरुन लोकांवर हल्ले करण्याचे अनेक प्रकार घडलेत. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात सरकारी यंत्रणा आणि प्रशासन कमी पडत असल्याचा ग्रामीण भागातील जनतेचा दावा आहे.

 

बिबट्यांनी हल्ला केल्यानंतर त्यामध्ये कोणी मरण पावल्यास आंदोलन, रास्ता रोको यासारखे प्रकार मागील काही काळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये घडले आहेत.

30,000,000,000 रुपयांचा भारतातील सर्वात मोठा बँक घोटाळा

असं असतानाच आता या प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमधील पीडितांच्या कुटुंबासंदर्भात राज्य शासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

 

राज्यात वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसच्या पराभवासाठी भाजपने केला अमेरिकेच्या CIAआणि इस्राईलच्या मोसादचा वापर ?

वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना सरकार थेट सरकारी नोकरी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. लवकरच कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

हा निर्णय अंतिम टप्प्यात असून फक्त शिक्कामोर्तब बाकी असल्याचं सांगितलं जात आहे. असं झालं तर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

अनेकदा बिबट्या आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात घरातील करती व्यक्ती गेल्यानंतर कुटुंब उघड्यावर पडतं. अशा कुटुंबांना या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा होईल.

नगरपालिका निवडणूक भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी राज्यभरात चर्चेत

सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025 मध्ये जुन्नर, शिरूर, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत बिबट्या हल्ल्यात एकूण 14 लोकांचा मृत्यू झाला. जुन्नरमध्ये चौघांचा मृत्यू झाला असून त्यात 3 मुलं आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.

 

नाशिकमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी पाच जणांनी बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमावले आहेत. हे मृत्यू मुख्यतः ऊसाच्या शेतांत झाले असून, यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीती आणि रोष निर्माण झाला आहे.

 

महाराष्ट्रातील एकूण बिबट्या हल्ल्यातील मृत्यू हे वन्य प्राण्यांमुळे झालेल्या एकूण 391 मृत्यूंपैकी 25 टक्के इतकी आहे. महाराष्ट्रात बिबट्या हल्ले मुख्यतः जुननर, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरसारख्या ऊस उत्पादक भागांत होतात.

तुकडेबंदीचे व्यवहार कायदेशीर होणार : जुने व्यवहार कायदेशीर कसे करायचे? सरकारकडून कार्यपद्धती जाहीर

2025 मध्ये हल्ल्यांची संख्या वाढली असून, वन विभागाने कॅमेरे, पिंजरे आणि जागरूकता मोहिमा सुरू केल्या आहेत. एकूण वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाघानंतर बिबट्यांचा वाटा दुसरा क्रमांकाचा आहे. ही आकडेवारी महाराष्ट्र वन विभाग आणि मीडिया अहवालांवर आधारित आहे.

 

जानेवारी ते नोव्हेंबर 2025 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात वाघ हल्ल्यात 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्यात 17 दिवसांत वाघांनी केलेल्या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबरमध्ये वाघ हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला.

आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या या 40 नगरपरिषदाच्या निवडणुकीवर कोर्टाची टांगती तलवार कायम

नोव्हेंबरमध्ये चिमूर तालुक्यातील एका शेतकऱ्याबरोबरच एकूण तिघांचा वाघ हल्ल्यात मृत्यू झालाय. हे मृत्यू मुख्यतः जंगलाजवळील शेतात किंवा जंगलात सरपाणासाठी लाकडं गोळा करताना झालेत.

 

 

Related Articles