Lalu Prasad Yadav;लालू प्रसाद यादव यांनी आपला मुलगा तेज प्रताप ची केली कुटुंब, पक्षातून हकालपट्टी, काय घडले कारण ?
Lalu Prasad Yadav expelled his son Tej Pratap from the party, what happened and why?

हे सुद्धा वाचा ….कुर्बानीसाठी अतिशय स्वस्त दरात शेतकऱ्याकडून बकरे विक्रीला
राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच तेज प्रताप यादव यांना कुटुंबातून देखील बेदखल करण्यात येत असल्याचं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
हे सुद्धा वाचा ….Bollywood News; Shahrukh Khan;ऑर्थर रोड जेलमध्ये असतांना शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काय खात असे ?
लालू प्रसाद यांनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, या पोस्टमधून त्यांनी याबाबत माहिती दिली, इथून पुढे आता तेज प्रताप यांची पक्षात आणि कुटुंबासाठी कोणतीही भूमिका नसेल असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यानं सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचा सार्वजनिक व्यवहार आणि वर्तन तसेच कार्यपद्धती आपल्या कौटुंबीक मुल्ये आणि परंपरांनुसार नाहीये. म्हणून मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे सुद्धा वाचा ….Maharashtra cabinet meeting; मंत्रिमंडळ बैठक ; 8 महत्त्वाचे निर्णय
आता त्याचा पार्टी आणि कुटुंब यामध्ये कोणतीही भूमिका नसणार आहे. मी त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करत आहे, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
त्याच्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी आणि गुण -दोष पाहण्यासाठी तो सक्षम आहे. ज्या लोकांना त्याच्यासोबत संबंध कायम ठेवायचे आहेत, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात योग्य अचारण असलं पाहिजे, या भूमिकेचा समर्थक राहिलो आहे, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर कबुली दिली होती, त्यांनी अनुष्का यादव नावाच्या एका तरुणीसोबत आपला फोटो शेअर केला होता,
हे सुद्धा वाचा ….लग्नात भेटीच्या फॉर्च्युनर कारची चाबी अजित पवारांच्या हस्ते दिली ?,आता दादा म्हणतात ‘माझा काय संबंध?
मी अनुष्कासोबत गेल्या 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान त्यानंतर आता तेज प्रताप यांचं देखील एक ट्विट समोर आलं आहे, त्यांनी आपलं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे.
काही फोटो चुकीच्या पद्धतीने एडीट करून माझ्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले, मला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा उद्देश यामागे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
लालूप्रसाद यांच्या या निर्णयामुळे पक्षात आणि कुटुंबात नवीन संघर्ष सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तेज प्रताप यांच्या हकालपट्टीमुळे राजदला फायदा होईल की विरोधी पक्षांना मोठा मुद्दा मिळाला आहे,
हे सुद्धा वाचा ….दहा वर्षात असा पहिल्यांदाच भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने परत पाठवले
हे येत्या बिहार विधानसभा निवडणुकीतच स्पष्ट होईल. तथापि, याआधीही तेज प्रताप यादव कुटुंब, पक्ष आणि लालू प्रसाद यादव यांच्यासाठी समस्या निर्माण करत आहेत.
बिहारच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे तेज प्रताप यादव हे राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र आहेत. तो त्याच्या अनोख्या शैली आणि विधानांमुळे अनेकदा चर्चेत असतो.
सध्या तेज प्रताप यादव हसनपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यापूर्वी तेज प्रताप यांनी २०१५ मध्ये महुआ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.
त्यानंतर त्यांना नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्रीही बनवण्यात आले. यानंतर, जेव्हा नितीश कुमार यांच्याशी पुन्हा युती झाली तेव्हा तेज प्रताप यांना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री बनवण्यात आले.
हे सुद्धा वाचा ….M P Deputy Chief Minister Jagdish Devda;उपमुख्यमंत्री म्हणाले भारतीय सैन्य मोदींच्या चरणी नतमस्तक आहे;वक्तव्याने खळबळ ,पाहा VIDEO
तेज प्रताप यांचा कार्यकाळ वाद आणि रंगीत विधानांनी भरलेला होता. तेज प्रताप हे त्यांच्या धार्मिक अवतारांमुळे, होळी सणामुळे आणि त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहतात.
कधी तो भगवान शिवाच्या रूपात तर कधी भगवान कृष्णाच्या रूपात प्रकट झाला. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. पण राजकीय विरोधकांनी ते बनावट म्हटले.
तेज प्रताप यादव यांचे वैयक्तिक आयुष्यही कमी चर्चेत राहिले. तेज प्रताप यादव यांनी २०१८ मध्ये बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्याशी लग्न केले, परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही.
हे सुद्धा वाचा ….पाकिस्तानसाठी पहलगामची रेकी ,जासूसी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक
नंतर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. हे प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. अनुष्का यादवसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तेज प्रताप यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
तेज प्रताप यादव यांनी निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची मालमत्ता २.८२ कोटी रुपयांची आहे. यासोबतच त्यांच्यावर १७ लाख ५७ कोटी रुपयांचे कर्ज आहे.