पाहा दोन दिवस कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस

See which district has rained for two days

bj admission
bj admission

 

 

 

गेल्या दोन दिवसापासून राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र काही भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

 

 

धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ देखील होत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यातील हवामान कसं असेल याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हे सुद्धा वाचा !BREAKING NEWS;शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीच्या नेत्यांसोबत बैठकीला

आज 18 जून भोकरदन तालुक्यामध्ये जवळपास 100 गावांना पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्याची व्याप्ती 40 ते 45 टक्के आहे. त्यानंतर नंदुरबार, जळगाव, वैजापूर भागात देखील आज काही ठिकाणी हा पाऊस होईल.

 

आजची व्याप्ती पेक्षा उद्याची व्याप्ती सर्वाधिक चांगली आहे. आज मेहकर, लोणार,परिसर देऊळगाव राजा, चिखली, देऊळगाव मही त्यानंतर जालना, कन्नड,

 

हे सुद्धा वाचा !मनोज जरांगें यांच्याकडून महायुती सरकारला अल्टिमेटम

शिजूच्या भागांमध्ये पावसाच्या चांगल्या सरी होणार आहेत. त्यानंतर अहिल्यानगर परिसरातला पश्चिमेकडील भाग संध्याकाळपर्यंत दुपारच्या वेळेला वातावरण हे कमी झाल्यासारखं वाटेल.

 

 

अंबड, घनसावंगी पट्ट्यात सुद्धा आज मोजक्या ठिकाणी तर उद्या बऱ्याच ठिकाणी सरी चांगल्या कोसळणार आहेत. एक स्प्रिंकलर सारख्या पाण्याची कंडिशन आपल्याला इथे पाहायला मिळू शकते.

 

हे सुद्धा वाचा !Breaking News: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाणानंतर आपत्कालीन लँडिंग

 

त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये आज काही तर उद्या बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उद्याचा पाऊस जो आहे 19 जूनचा तो चांगला असेल. दरम्यान, सध्या राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडताना दिसत आहे.

 

 

अकोला, अमरावतीनंतर वाशिम, हिंगोली, नांदेड हे दोन्ही दिवस पावसाचे आहेत. 18 जूनला थोडी व्याप्ती कमी जरी असली तरी 19 जूनला व्याप्ती जास्त आहे.

 

हे सुद्धा वाचा !विमानाच्या चाकातून आग आणि धूर 250, हज यात्रेकरू बालंबाल बचावले

 

 

त्यानंतर चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ ह्या भागांची जी पावसाची प्रतीक्षा आहे ती उद्यापासून संपण्यात जमा आहे. उद्यापासून चार-पाच दिवस यांना भाग बदलत का होईना पश्चिम महाराष्ट्र सारखा पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

त्यानंतर लातूर पट्टा, परभणीचा काही भाग, बीडचा जो काही परिसर आहे, त्यामध्ये आजचा दिवस पाऊस कमी राहील. मात्र उद्या इकडे ही तीव्रता वाढते आहे. नांदेड सर्वाधिक जास्त असेल वाशिम सर्वाधिक जास्त असेल यवतमाळ ही जास्त असणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *