Pankaja Munde News; धनंजय मुंडेच्या विपश्यना केंद्रात;काय म्हणाल्या पंकजा मुंडे

Pankaja Munde News;What did Pankaja Munde say at Dhananjay Munde's Vipassana center?

 

 

 

मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख प्रकरणातील गंभीर आरोप आणि करुणा शर्मा यांनी केलेले आरोप या विविध कारणांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे सध्या मन:शांतीच्या शोधात आहेत.

 

सध्या ते इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेले खाते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आले.

 

हे सुद्धा वाचा !…..CRIME NEWS;पोलीस उपनिरीक्षकाला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा ;पाहा काय आहे प्रकरण

त्यानंतर मुंडे गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरीत दाखल झाल्याचे समोर आले आहे. आता याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

मागील आठ दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे नाशिक मधील इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रामध्ये दाखल झाले आहेत. याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांना विचारले असता धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आहे.

 

आता मन:शांतीसाठी होईल असे वक्तव्य त्यांनी केले आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे सुद्धा वाचा !…..Rain warningALERT;1 ते 3 जून दरम्यान कुठे पडणार पाऊस ;हवामान विभागाचा काय आहे अंदाज ?

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे. सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

 

याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे.

 

राजेंद्र हगवणे हा अजित पवार गटाचे सदस्य असल्याने या प्रकरणाने आता राजकीय वातावरणही तापले आहे. या प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

हे सुद्धा वाचा !…..political news;महायुतीत तणाव;अजितदादांच्या माजी मंत्र्याला बावनकुळेंनी सुनावले

याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, वैष्णवीला न्याय मिळायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे. याबाबतचा सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतील.

 

महिला आयोगाने दखल घेणे क्रमप्राप्त आहे. कुठलीही तक्रार असू देत महिला आयोगाने ती घेतली पाहिजे आणि पोलिसांनी कारवाई करायला हवी, असे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा !…..Marathwada News;मराठवाड्यातील मंत्र्याला राऊत म्हणाले ,पचास पचास खोके आये थे. उनको ज्यादा मिला क्या !

दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्या म्हणाल्या की, पर्यावरण संवर्धनासाठी कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे.

 

प्रत्येक राज्यात कार्यक्रम राबवले जात आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाला महत्त्व देण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे.

हे सुद्धा वाचा !….. World War III;डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान;रशियाने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी

दगडूशेठ मंडळ या पर्यावरण उपक्रमामध्ये सहभागी झाला आहे. प्लास्टिकचा वापर करू नका, असे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती देखील पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *