Marathwada News;मराठवाड्यातील मंत्र्याला राऊत म्हणाले ,पचास पचास खोके आये थे. उनको ज्यादा मिला क्या !

Raut told the minister from Marathawa, "Fifty-fifty boxes had arrived. Did they get more?"

 

 

 

महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या कौटुंबिक वादळाला अखेर पूर्णविराम मिळाला. पण आज खासदार संजय राऊत यांनी दुसर्‍या एका प्रकरणाचा गौप्यस्फोट केला.

 

सिद्धांत शिरसाट यांच्या कमाईचे साधन काय असे विचारत त्यांनी महागडी मालमत्ता खरेदीसाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून असा सवाल राऊतांनी केला. काय आहे हे प्रकरण? काय आहे राऊतांचा तो दावा?

हे सुद्धा वाचा ;….कुर्बानीसाठी अतिशय स्वस्त दरात शेतकऱ्याकडून बकरे विक्रीला

आज झालेल्या पत्र परिषदेत संजय राऊत म्हणाले की, हे कौटुंबिक विषय असतात. यात आमच्या सारख्या नेत्याने पडू नये. त्यासाठी महिला आयोग आहे. महिला आघाड्या आहेत. त्यांनी यावर बोललं पाहिजे.

 

मी कधी कुणाच्या कौटुंबिक विषयावर बोलत नाही. बोलू नये. पण तुम्ही ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं संजय शिरसाट आणि त्यांचे चिरंजीव आहेत. त्यापेक्षा भयंकर प्रकरण आहे, असा दावा राऊतांनी केला.

हे सुद्धा वाचा ;….Bollywood News; Shahrukh Khan;ऑर्थर रोड जेलमध्ये असतांना शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काय खात असे ?

या महाशयांनी संभाजीनगर मधील वेदांत हॉटेल आणि प्रॉपर्टी प्रकरण आहे. अत्यल्प मूल्यावर आपल्या नावावर ती प्रॉपर्टी ताब्यात घेतली.

 

जणू ही संपूर्ण प्रॉपर्टी सिद्धांत शिरसाट यांनाच मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर राबवली. ६७ कोटी रुपयाला प्रॉपर्टी घेतली. आकडा लहान नाही.

 

एका मंत्र्याच्या मुलाकडे ६७ कोटी आहे. जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे. ६७ कोटी रुपयाला वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी ही विकत घेतली.

हे सुद्धा वाचा ;….Coronavirus Update;राज्यात पुन्हा कोरोना ?आरोग्यमंत्री आबिटकर काय म्हणाले ?

मूळ किंमती पेक्षा कमी पैशात ही प्रॉपर्टी त्यांना मिळावी म्हणून ही लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली. टेंडर भरणाऱ्यांना कमी रक्कम भरायला लावली.

 

एका मंत्र्याचा मुलगा आगापिछा नाही. महान नाही. उद्योग क्षेत्रात नाव नाही. संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. कुठून आले पैसे.

हे सुद्धा वाचा ;….Nanded News;सापळा रचून 14 लाखांचा बोगस खत जप्त

कोणत्या टेंडरींगमधून आले. कोणत्या दलालीतून आले. एकनाथ शिंदेंनी दिले पैसे की अमित शाहनी दिले, असा घणाघात राऊतांनी घातला. पचास पचास खोके आये थे. उनको ज्यादा मिला क्या.

 

येईल आता. मंत्र्याचा मुलगा ६७ कोटीत हॉटेल विकत घेतो. तुमची मुलंबाळं विकत घेऊ शकता का. अचानक पैसा कुठून आला. आमचा मुलगा ६७ कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो हा या राज्यातील सोशल जस्टीस आहे, असा हल्लाबोल राऊतांनी शिरसाट यांच्यावर केला.

 

हे सुद्धा वाचा ;….BREAKING NEWS;मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मोबाईल बाबत घेतला महत्वाचा निर्णय

प्रॉपर्टीची किंमत अधिक आहे. ही प्रॉपर्टी ६७ कोटीला विकत घेतली. अंबादास दानवे हे आमचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी या प्रक्रियेत कसा घोटाळा झाला.

 

याचं पत्र सरकारला दिलं आहे. मी कालच अंबादास दानवेंशी चर्चा केली. हे प्रकरण जनतेसमोर आणा. जनसेवेसाठी, बाळासाहेबांच्या विचारासाठी ज्यांनी पक्ष सोडला आणि आमची शिवसेना खरी असं म्हणतात.

हे सुद्धा वाचा ;…. हवमान विभागाने सांगितले ,जूनमध्ये किती पाऊस पडणार

ती खरी आहे का, असा सवाल राऊतांनी केला आहे. तर अमित शाह यांनी त्यांना महाराष्ट्र लुटीचा परवाना दिला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *