शिंदेंचे मराठवाड्यातील मंत्री म्हणाले ,उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावले तर मी जाणार

Shinde's minister in Marathwada said, "If Uddhav Thackeray invites me to meet him, I will go."

bj admission
bj admission

 

 

राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. मुंबई महापालिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व राहिले आहे.

हे सुद्धा वाचा; इराण इस्राईल युद्ध ब्रेकिंग; इराणचा इस्रायलवर हल्ला , ड्रोन डागले, जाॅर्डनमध्ये सायरन वाजू लागले

ते कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. याचबरोबर राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट झाली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावले तर मी जाणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे नेते व मंत्र्यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय मंत्री व शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधून राजकीय भाष्य केले.

हे सुद्धा वाचा;यापूर्वीही भारतात विमान अपघातामुळे बड्या नेत्यांचा मृत्यू झाला

मागील काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या भूखंड आणि जमीन खरेदीचे प्रकरण थांबता थांबत नाहीये.

 

एकापाठोपाठ एक शहर व शहरालगतच्या भागात संजय शिरसाट यांनी आपल्या दोन्ही मुले व पत्नीच्या नावाने कोट्यावधी रुपयांची जमीन आणि प्लॉट खरेदी केल्याचा दावा एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा;Plane Crash News;टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटातच सर्व संपले

यावर संजय शिरसाट म्हणाले की, उठावानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना अंगावर घेण्याचं काम केलं होत, त्या अर्थाने मी बोललो, मला इम्तियाज जलील बद्दल बोलायचं नाही, मला थोडा वेळ द्या, पूर्ण ताकदीनिशी मी बोलेल, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.

 

त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा;Indian Railways Breaking News;रेल्वे आरक्षणाच्या नियमात 1 जुलैपासून मोठे बदल

मात्र अहमदाबाद येथे झालेल्या अपघातानंतर आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

त्यांना शुभेच्छा देताना संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांनी चांगले राहावं, चांगलं वागाव, चांगलं बोलावे.

हे सुद्धा वाचा;Maharashtra Monsoon Alert;पाच दिवस धोक्याचे ;हवामान विभागाचा मोठा इशारा

लवकर लग्न करावं, वडिलांसुद्धा सुद्धा त्रास होता कामा नये, याची काळजी घ्यावी. भविष्यात चांगला मोठा नेता व्हावा. या मनापासून शुभेच्छा, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

 

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. उद्धव-राज हे ठाकरे बंधू मागील वाद विसरुन पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा होत्या.

हे सुद्धा वाचा;Indian Railways Breaking News;रेल्वे आरक्षणाच्या नियमात 1 जुलैपासून मोठे बदल

मात्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चांना पूर्णविराम लावला आहे. यावर संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल, यावर आमच्या शुभेच्छा आहेत.

 

भेट झाली यात काही राजकीय चर्चा झाल्या आहेत, शरद पवार व अजित पवार भेटी होतात, मी उद्धव ठाकरे यांनी बोलावले तर भेटायला जाईल, यात परत राजकीय चर्चा करू नका, असे सूचक वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा;NCP’s serious allegation;आमदार तोडपाणी साठी कामे अडविण्याचे काम करतात राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

सामाजिक न्याय खाते सांभाळणारे संजय शिरसाट हे महायुतीमध्ये निधीवरुन नाराज आहेत. त्यांच्या खात्याला अर्थमंत्री अजित पवार हे निधी देत नसल्याची तक्रार ते अनेकदा माध्यमांसमोर करत आहेत.

 

तसेच सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेला वळवला जात असल्याची आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. याबाबत ते पुन्हा म्हणाले की, मला पण निधी दिला जात आहे, माझी नाराजी नाही, माझी दादाची भेट झाली, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा;माजी खासदार इम्तियाज जलील यांचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप

तसेच अहमदाबाद येथे झालेल्या अपघाताबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, काल विमान दुर्घटना सर्व देशाला जाणीव करून देणारे होती.

 

मन हेलावणारी लागणारी घटना होती, अनेकजण गेले आहेत, चूक कशी झाली, कोणामुळे झाली, याची चौकशी होईल. भविष्यात अशा घटना घडू नये, याचा प्रयत्न केला जाणार, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *