अजित पवार गटाची विदर्भातील भाजपच्या या 3 जागांवर नजर
Ajit Pawar group eyes on these 3 seats of BJP in Vidarbha
आगामी लोकसभा निवडणूकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांकडून सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान देशातील तसेच राज्यातील एनडीएतील घटक
आगामी लोकसभा निवडणूकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांकडून सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान देशातील तसेच राज्यातील एनडीएतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भाजप यांच्यात जागावाटपाचा सुत्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीये. यादरम्यान विदर्भातील तीन जागांवर दावा करण्यात आला आहे.
शरद पवारं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विदर्भातील 10 पैकी 3 जागेवर दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया, गडचिरोली तसेच वर्धा जिल्हा या तिन्ही जागेवर भाजपचे खासदार आहेत.
यात भाजपचे विद्यामान खासदार असलेल्या अशोक नेते यांचा जागेवर देखील अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा यांनी स्वतः इच्छुक असल्याच सांगतीले आहे.
तसेच बरोबर भंडारा-गोंदिया या ठिकाणी भाजपचे सुनील मेंढे विद्यमान खासदार आहेत, पण याठिकाणी सुद्धा दावा करण्यात आला असून प्रफुल पटेल यांच्यासाठी ही जागा मागण्याची अजित पवार गटाची तयारी आहे.
तसेच वर्ध्यात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आहेत. असे असताना देखील या ठिकाणी या जागेची देखील अजित पवार गटाकडून मागणी केली जात आहे..
त्याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री राहिलेले सुबोध मोहिते हे स्वतः तयारी करत असून वर्धा लोकसभा मतदार संघातील अनेक लोकांचा ते संपर्कात आहेत. त्यामुळे आता या तीन जागांवर काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.