शिवसेना गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान म्हणाले, शरद पवार यांच्या अनुभवाचा सरकारला फायदा होईल
Shiv Sena group minister makes big statement, says Sharad Pawar's experience will benefit the government

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार हे मोठे नेते, आहेत. त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत असेल. त्यांच्या अनुभवाचा राज्य सरकारला फायदा होईल असे प्रताप सरनाईक म्हणाले.
शरद पवार आता नवीन नेतृत्वाच्या हाती सत्ता देऊ पाहत आहेत. नव्या नेतृत्वाला संधी देऊ पाहत आहेत. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे. राष्ट्रवादीचे नेते जर महातुतीत आले तर त्यांचे 100 टक्के स्वागत आहे असे सरनाईक म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरुन दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती.
त्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांच्या ऐकमेकांशी गाठी भेटी देखील सुरु होत्या. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अ
जित पवार एकत्र आल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. अशातच शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
शरद पवारांच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या आहेत. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही? हा निर्णय सुप्रियानं घ्यावा. सुप्रिया सुळेंचं काय? या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
पक्षात दोन प्रवाह आहेत, एकाला वाटते अजितसोबत जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. भविष्यात एकत्र यायचं की नाही? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे.
मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय…आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत. आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांधले गेलेले आहेत.
होय, राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकासकामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही,
त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे.
त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, असे शरद पवार म्हणाले.