पाकिस्तान विरोधात भारताचे ऑपरेशन सिंदूर ;पहा VIDEO

India's Operation Sindoor against Pakistan; Watch VIDEO

 

 

 

गेल्या महिन्यात 22 एप्रिल 2025 ला जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करुन 27 पुरुषांची हत्या केली होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक झालेला भारताने आपला बदला पूर्ण केला.

 

बुधवारी रात्री 7 मे 2025 ला मध्यरात्री भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या ठिकाण्यावर हल्ले केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल्यात भारतीय हवाई दलाने

 

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये ऑपरेशन सिंदूर घडवलं. भारताने एकूण नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला . आता पाकिस्तानमधून ऑपरेशन सिंदूरचे व्हिडीओ समोर आले आहेत.

 

रात्री उशिरा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानच्या लोकांनी व्हिडीओ बनवले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठा हल्ला केल्याची पुष्टी केली.

 

बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद भागात हे हल्ले करण्यात आले. भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे की,

 

लक्ष्य फक्त दहशतवादी तळ होते आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला झाला नव्हता. हल्ले कुठे झाले ते व्हिडिओ पाहू.

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *