बेरोजगारीवर उपाय ;मराठवाड्यात उच्चशिक्षित तरुणांचा RTO अधिकारी बनून वाहनचालकांकडून वसूली
Solution to unemployment; Highly educated youth become RTO officers and collect money from drivers

बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईच्या दोन तरुणांना एका गंभीर गुन्ह्याप्रकरणी अटक केली आहे. हे दोनही तरुण अनेक दिवसांपासून आरटीओ अधिकारी बनून वाहनचालकांकडून वसूली करत होते.
पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर मोठ्या शिताफिने दोघांना अटक केली. या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता हे दोन तरुण बेरोजगार असल्याने त्यांनी हि फसवेगिरी केल्याचे उघड झाले आहे.
बेरोजगारी तरुणांना गुन्हेगार बनवते असे बरेचदा समोर येते. हाती काम नसल्याने आणि झटपट श्रीमंत होण्याच्या नादात युवक चुकीच्या मार्गाला लागतात.
आणि देशोधडीला लागतात. चुकीच्या मार्गाने भरपूर पैसा कमावण्याच्या नादात तरुण आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावतात. अशीच एक घटना बीड मधून समोर आली आहे.
अजय बालाजी गाडगे (वय २४ रा. घाटकोपर, मुंबई) आणि दिनेश मंगल धनसर (अं. वय २८ रा. मुंबई) या दोन तरुणांनी पैसा कमावण्यासाठी अनोखी शक्कल लढवली.
मुंबईचे हे दोन सुशिक्षित बेरोजगार तरुण नकली आरटीओ अधिकारी बनले. त्यांच्याजवळ असलेल्या स्कार्पिओ गाडीला आरटीओचे लोगो लावत रस्त्यावरच वाहनचालकांची अडवणुक करुन त्यांना लुटायचे.
हे दोघेही आरोपी खोटी कारवाई करत असतानाच बीडचे स्थानिक पोलिस येऊन तिथे पोहोचले. पोलिसांनी या दोघांकडे ‘कसली कारवाई करत आहात?’ अशी विचारणा केली असता दोघेही गडबडले.
पोलिसांना दोघांचीही हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी आरोपींजवळ त्यांची ओळखपत्रे तपासणीसाठी मागितली. ओळखपत्र तपासली असता पोलिसांना खात्री की पटली की हे दोन आरोपी तोतया आहेत.
बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा फाटा येथे बीड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून स्कार्पिओ गाडीसह 11 लाख 58 हजार रुपयाचा ऐवज हस्तगत केला आहे.
पोलिसांनी पकडलेल्या स्कार्पिओ गाडीचा क्रमांक MH- 47 AB-3639 असा असून यांना आता बीड पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बीड स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.