महाराष्ट्रात लवकरच काँग्रेस राज्यात ‘भाकरी’ फिरवणार

Congress will soon distribute 'Bhakri' in Maharashtra

 

 

 

विधानसभेतील दारुण पराभवानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार आहे. आता काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल होणार आहे,

 

असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत. 2025 मध्ये देशा बरोबरच महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होतील. जो सर्वात जास्त फसवणूक आणि भ्रष्टाचार करतो त्याला सरकार शब्बासकी देत आहे

 

आणि राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कामगिरीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले की, धनंजय मुंडे राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते, जनतेच्या उद्रेकामुळे भीतीपोटी सरकारने मुंडेंचा राजीनामा घेतला.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत.

 

2025 हे वर्ष काँग्रेसने संघटनात्मक वर्ष म्हणून घोषित केले आहेत .देशभर काँग्रेसमध्ये बदल होतील त्याचबरोबर महाराष्ट्रातीलही संघटनेत बदल होतील असं सपकाळ यांनी सांगितले.

 

जो जास्त भ्रष्टाचार करेल त्याला सरकार शब्बासकी देते अशी टीका राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कारभारावर सपकाळ यांनी केली आहे.

 

संविधानिक पद्धतीने अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच होई. दुःख व्हायचं कारण नाही अशा शब्दात अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याच्या मुद्द्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

ज्या ज्या ठिकाणी जातीजातीमध्ये तेढ निर्माण झाला आहे काही, चुकीच्या घटना घडतात त्या ठिकाणी सद्भावना यात्रा सुरू आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर झालेला नाही.

 

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संताप उसळल्यामुळे घाबरलेल्या सरकारने त्यांचा राजीनामा घेतला. धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते.

 

गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीवर सपकाळ यांनी बोलणं टाळलं. गौतम अदानी यांच्या भेटीवर शरद पवार यांनीच बोललेलं योग्य राहील.

 

शक्तिपीठ महामार्ग हा गौतम अडाणी यांना रेड कार्पेट टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची खटाटोप सुरू आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला आम्ही विरोध करतो आहोत, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *