एक्झिट पोलच्या अंदाजा नंतर मोदी ऍक्शन मोडमध्ये ;करतायेत 100 दिवसांचा प्लॅन
Modi in action mode after exit polls, 100 days plan
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टप्पा संपताच बाहेर आलेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये मोदी 3.0 सरकार स्थापन झाल्याचे दिसून आले.
मात्र, 4 जून रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा अंतिम निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल अद्याप आलेले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत.
कारण पीएम मोदी आज रविवारी एका दिवसात सात बैठका घेत आहेत. ज्यामध्ये पीएम मोदी पुढील सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यावर चर्चा करतील. याशिवाय चक्रीवादळाची परिस्थिती, उष्णतेची लाट, पर्यावरण दिन यासह अनेक विषयांवर बैठका होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं दीड महिना सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत ते पूर्णपणे सक्रिय झाल्याचेही दिसून आले. त्यांनी दररोज विविध राज्यांमध्ये अनेक निवडणूक रॅली आणि रोड शो केले.
व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी महत्त्वाच्या बैठकांना हजेरी लावली. रेमल चक्रीवादळाचा इशारा आल्यावर त्यांनी दिल्लीत अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती.
निवडणूक प्रचाराचा गोंगाट थांबताच पंतप्रधान मोदी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पोहोचले आणि तेथे ४५ तास ध्यानधारणा केली. या काळात मौनव्रतही पाळण्यात आले. शनिवारी त्यांनी ४५ तासांचे ध्यान पूर्ण केले.
इकडे निवडणुकीचा जल्लोष संपताच बाहेर पडलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यानंतर पंतप्रधान पुन्हा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
पीएम मोदी आज सात सभा घेणार आहेत. यावेळी ते देशातील अनेक भागांमध्ये रेमाल चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांचा आढावा घेतील.
ईशान्येकडील चक्रीवादळाच्या स्थितीबाबत आढावा बैठक घेणार. यासोबतच पंतप्रधान उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीचाही आढावा घेणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी बॅक टू बॅक बैठकीत पर्यावरण दिनाच्या तयारीवरही चर्चा करतील. याशिवाय नव्या सरकारच्या 100 दिवसांच्या रोड मॅपवरही चर्चा होणार आहे.
नव्या सरकारचा 100 दिवसांचा अजेंडा काय असेल यावरही चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकूण सात बैठका घेणार आहेत. या बैठकांत इशान्य भारतात आलेल्या वादळावर चर्चा होणार आहे.
या वादळाच्या अनुषंगाने काय तयारी चालू आहे, काय काम केलं जातंय यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारमध्ये पुन्हा एकदा आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत करावयाच्या कामांबाबत ते एक मास्टर प्लॅन तयार करणार आहेत.
त्यासाठी तयारीदेखील चालू झाली आहे. त्याच अनुषंगाने मोदी यांच्या एकूण सात बैठकांना आता महत्त्व आले आहे.
1 जून रोजी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यावेळीही भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला एकूण 353-383 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळू शकात. हा अंदाज खरा ठरल्यास मोदींचा पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा होईल.
दरम्यान, मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी देशातील मतदारांचे एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच विरोधकांच्या इंडिया आघाडीला जनतेने नाकारले आहे, असा दावाही त्यांनी केला.