पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी

Dissatisfaction within the Mahayuti over the post of Guardian Minister

 

 

 

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होण्याच्या आधीपासूनच महायुतीत आलबेल नसल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही काही निर्णयांवर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याचे दिसत आहे.

 

नुकतीच फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्याअंतर्गत कॅबिनेट मंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड आणि

 

नाशिक जिल्ह्याची मागणी स्वत:कडे केली होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची कन्या तथा महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना दिले.

 

तर नाशिक जिल्ह्याची जबाबदारी भाजपचे गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली. शिवसेनेने नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकारने दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली.

 

पालकमंत्री पदाच्या या स्थगिती निर्णयामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते नाराज झाले आहेत. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि

 

शिवसेना यांच्यात आधीच तणावाची परिस्थिती आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेने यापूर्वीच दावा केला होता. त्यानंतरही हे पद राष्ट्रवादीला दिल्याने एकनाथ शिंदे संतापले होते.

 

यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांचे निर्णय रद्द केले होते,

 

त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार दुखावले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली होती.

 

त्यावर अजित पवार म्हणाले होते की, महायुतीत सर्वांना एकत्र पुढे जायचे असेल तर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चर्चा झाली पाहिजे.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे सध्या सातारा येथील दरे गावात मु्क्कामाला गेले आहेत.

 

त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने तातडीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संकटमोचक नेते गिरीश महाजन यांना पाठवलं आहे. खास चॉपरने तातडीने दरे गावी जाऊन बावनकुळे आणि

 

महाजन हे एकनाथ शिंदे यांची भेट घेतील आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती आहे. दोन जिल्ह्यांच्या पालक मंत्रिपदांवरुन शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

 

सत्तास्थापनेवेळी रुसलेल्या एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली, ते उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यथावकाश मंत्र्यांची नियुक्ती, मंत्रिपदांचे वाटप झाले.

 

गेल्याच आठवड्यात पालकमंत्र्यांची नावंही जाहीर झाली. परंतु नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालक मंत्रिपदांवरुन शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

रायगडची धुरा आदिती तटकरे, तर नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत.

 

त्यामुळे भरतशेठ गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. परंतु अदिती तटकरेंनी मागच्या वेळी पालकमंत्रिपदी केलेली कामगिरी आणि लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी,

 

याची बक्षिसी म्हणून पुढील पाच वर्षांसाठी त्यांना रायगडचे पालकमंत्रिपद दिल्याचे दिसते. तर नाशिकची धुरा दादा भुसेंना मिळण्याचा अंदाज होता. परंतु शिंदेंच्या नाराजीमुळे तूर्तास या दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत समजूत काढण्याची जबाबदारी बावनकुळे-महाजनांवर आहे. वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महायुतीत ठिणग्या पडून आगामी निवडणुकीत फटका बसू नये यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.

 

दरम्यान, रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने शिवसेना नाराज असल्याची चर्चेबाबत यावेळी विचारणा केली असता उदय सामंत म्हणाले की,

 

रायगडचे पालकमंत्रिपद हे शिवसेनेच्या वाट्याला येईल, अशी आम्हांला अपेक्षा होती. यासाठी भरत गोगावले यांची निवड केली जाईल, असे आम्हाला वाटत होते.

 

मात्र हे पद शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे आम्ही सर्व नेते मंडळी आणि आमदारांची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. एकनाथ शिंदे लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *