काँग्रेसला मुस्लिम, दलित समाजाची मते मिळाली नसती तर डिपॉझिट जप्त झालं असतं
If Congress had not got the votes of the Muslim, Dalit community, the deposit would have been confiscated

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जर मुस्लिम आणि दलित समाजाची मते मिळाती नसती तर काँग्रेसंच डिपॉजीट जप्त झालं असतं, अशी टीका
प्रहार शेतकरी संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केली. ते अमरावतीत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील टीका केली.
जयंत पाटील यांनी तिसऱ्या आघाडीवर टीका केली होती. या टीकेला आमदार बच्चू कडू यांनी चोख प्रत्त्युत्तर दिलं आहे. त्यांच्यात दम राहिला नाही .
त्यांना वाटत असेल की आम्हीउभं राहिल्याने तुमचं नुकसान होत असेल तर तुमची कुवत काय हे माहिती पडते. त्यांची कुवत नाही असंही कडू म्हणाले.
दरम्यान, कलेक्टरवर महिना 7 लाख रुपये खर्च होतो तर आमदारावर साडे तीन लाख रुपये महिना खर्च होत असल्याचे कडू म्हणाले.
दरम्यान, सगळे पक्ष वाढले पाहीजेत. कारण दुकानदारी वाढली की उधार घ्यायला बरं होतं असे म्हणत बच्चू कडू यांनमी मनसे प्रनुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
गावात एकच दुकान राहिली तर मक्तेदारी वाढते. दहा दुकानं झाली की दुकान चालते, जे चांगलं देईल त्याची दुकानदारी चालेल असंही कडू म्हणाले.