Maharashtra Monsoon Alert;पाच दिवस धोक्याचे ;हवामान विभागाचा मोठा इशारा
Maharashtra Monsoon Alert;Five days of danger; big warning from the Meteorological Department

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीनुसार पुढील 5 दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार उद्यापासून (12 जून) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
हे सुद्धा वाचा !NCP’s serious allegation;आमदार तोडपाणी साठी कामे अडविण्याचे काम करतात राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
तर मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या भागात पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे काही ठिकामी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.
हे सुद्धा वाचा !माजी खासदार इम्तियाज जलील यांचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप
येणाऱ्या 13 ते 16 जून या काळासाठीही हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. या काळात कोकणातील नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात. ज्यामुळे नद्यांच्या काठावर गैरसोय होऊ शकते, असं मुंबईच्या विभागीय हवामान विभागाने सांगितलं आहे.
हे सुद्धा वाचा !शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
तसेच, 13 ते 16 जून या काळात स्थानिक पूरामुळे पूल झाकले जाऊ शकतात. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. डोंगराळ उतारांवरून वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाट रस्त्यांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, असंही मुंबईच्या विभागीय हवामान विभागाने सांगितलं आहे.