2025 मध्ये मोडणार उष्णतेचा सर्व रेकॉर्ड
All heat records will be broken in 2025

सध्या देशातील काही भागात सूर्य आग ओकतोय. या भागात तापमान आताच 40 अंशांच्या पुढे गेले आहे. अजून तर मे महिना जायचा आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे सर्वात उष्ण ठरणार का? असा सवाल विचारला जात आहे.
गेल्यावर्षापेक्षा यंदा जास्त ऊन पडलं तर काय होईल, याची भीती नागरिकांना सतावत आहे. देशात 1901 नंतर वर्ष 2024 मध्ये उष्णतेने नवनवीन रेकॉर्ड केले होते.
यंदा तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच भीषण उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा 2025 हे सर्वात हॉट ठरेल का? याची चर्चा होत आहे.
उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक शहरात सध्या अशीच स्थिती आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात पाऱ्याने डोळे वटारले आहेत. भीषण गर्मी आणि दमट वातावरणामुळे अनेक भागात उकाडा असह्य झाला आहे.
घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे एप्रिलनंतर मे आणि जून हे सर्वाधिक उष्ण महिने असतील का, असा सवाल विचारला जात आहे.
पण मध्यंतरी हवामानात बदल झाल्याचे दिसले. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पारा खाली आला.
विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यातल पारा 40 अंकांचा काटा पार कडून पुढे सरकला आहे. तर मुंबईत पारा 35 अंशांच्या घरात पोहचला आहे.
त्यामुळे उन्हात फिरता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचा एक बळी गेला आहे. त्यामुळे दुपारी उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने तलाव, धरणातील पाणी साठ्याचे बाष्पीभवन झाले आहे.
त्यामुळे अनेक भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. विहिरी, कूप नलिका कोरड्या पडल्या आहेत. तर नदी नाले तर कधीच कोरडेठाक पडले आहेत. शेतीच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. अनेक भागात टँकरच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. राज्यात पुढील एक ते दोन दिवसांत पाऊस पडणार आहे. त्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे संकट पुन्हा एकदा आले आहे.
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रीय असलेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला आहे. परंतु राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
तसेच तापमान वाढत आहे. त्यामुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्याचा परिणाम ढग निर्माण होऊन पाऊस पडणार आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट अन् पाऊस होणार आहे.
वादळे वारे ताशी ३०-४० किमी वेगाने वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील वातावरणात बदल होत असला तरी इतर भागात तापमानात फारशी घट झाली नाही. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा १ ते २ अंश सेल्सिअसने कमी झाला आहे.
परंतु विदर्भात उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ४२.४ अंश अकोल्यात होते. अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम येथेही ४० अंशाच्या वर तापमान होते.
दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे
नाशिक जिल्ह्यात रविवारी अवकाळी पाऊस झाला. नाशिकमधील चांदवडच्या ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसासोबत काही ठिकाणी गारा देखील पडल्या.
पावसाने सर्वात जास्त शिरवाडे वणी भागाला झोडपून काढले. त्यामुळे काढणीला आलेला गहू, कांदा या पिकांबरोबरच द्राक्षे बागांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगावमधील रावेरमध्ये अवकाळी पावसामुळे केळीचे नुकसान झाले.
नांदेडमध्ये रविवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात हवामान खात्याकडून येलो अलर्ट केला आहे. यापूर्वी झालेल्या वादळीवारा, अवकाळी पाऊस व गारपुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.