राज्यात पावसाचा इशारा ,हवामान विभागाचा नवा अलर्ट

Rain warning in the state, new alert from the Meteorological Department

 

 

 

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कडाक्याच्या थंडीनंतर राज्यातील किमान तापमानामध्ये आता वाढ नोंदवली जात आहे.

 

राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील किमान तापमानामध्ये 3 ते 4 अंशांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे.

 

तसेच राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान देखील पाहायला मिळत आहे. राज्यात 24, 25 आणि 26 डिसेंबर रोजी तुरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 22 डिसेंबर रोजी राज्यातील हवामान कसं असेल.

 

मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असतं किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे.

 

मुंबईतील किमान तापमानामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर गारठा देखील कमी झाल्याचे पाहायला मिळेल. तर पुण्यामध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता

 

भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. यानंतर मात्र आकाश निरभ्र होईल. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.

 

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ आकाश पाहायला मिळत आहे. किमान तापमानामध्ये देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

त्यामुळे थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 डिसेंबर रोजी सामान्यतः निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर

 

किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.

 

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहील तर नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. 23 डिसेंबरपासून विदर्भात हलक्या पावसाची देखील शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

 

पुणे वेध शाळेच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकणार आहे. आणि यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार असल्याने इशान्येकडील राज्यांत व विदर्भात पुढील दोन पावसाची शक्यता आहे.

24 आणि 25 डिसेंबर रोजी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असल्याने या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

 

तर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 25 ते 29 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

 

26 ते 8 डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत पावसाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे यंदा नाताळात थंडी नाही तर पाऊस अनुभवता येणार आहे. पण पुन्हा 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

मुंबईसह कोकण सोडून इतर महाराष्ट्रात 24 डिसेंबरपर्यंत पहाटे पाचचे किमान तापमान सरासरीपेक्षा 1 ते 4 अंशाने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवणार आहे.

 

मुंबईसह कोकणात मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशाने खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने तेथे अधिक थंडी आहे. मुंबईचे किमान तापमान 19 अंश असून, रात्रीसह पहाटेच्या वातावरणातील गारवा कायम आहे.

 

भारतीय हवामानशास्त्र विभाग नुसार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवस थंडीची लाट कायम राहील. राजस्थान आणि पंजाबमध्ये दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून,

 

येथेही थंडीच्या लाटेबाबत इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, थंडीची लाट लक्षात घेता, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवसांसाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे,

 

तर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये हवामान खूप थंड असेल. IMD नुसार, उत्तर-पश्चिम भारतात थंड लाटेचा प्रभाव नंतर कमी होईल, परंतु 23 डिसेंबरपासून पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र धुक्याचा प्रभाव दिसून येईल. या दोन्ही राज्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *