पारा घसरला, परभणीला हुडहुडी ;मराठवाड्यात थंडीचा जोर कायम
The mercury has dropped, Parbhani is shivering; Cold continues in Marathwada
डिसेंबमध्ये महिन्याचा सुरुवातील अनेक ठिकाणी पाऊस पडला होता. पण गेल्या आठवड्यापासून परत एकदा थंडीने जोर धरला आहे. मराठवाड्यातमध्ये थंडीचा कडाका वाढला असून काही ठिकाणी पारा 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.
मराठवड्यामध्ये सर्वांत कमी तापमान परभणीमध्ये नोंदवलं गेलं आहे. परभणीमध्ये आज किमान तापमान 11 अंश सेल्सिअस एवढे राहील. जालना, बीड आणि धाराशिवमध्ये किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नांदेड, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस असेल. या ठिकाणी आज हवामान हे कोरडे असेल.
संभाजीनगरमध्ये कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअस असेल. किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस राहील. यामुळे सकाळी आणि रात्री कडाक्याची थंडी आहे आणि दिवसभर हलकी थंडी देखील वाजण्याची शक्यता आहे.
थंडीचा जोर वाढल्यामुळे वातावरणात बदल होत आहे. तरी नागरिकांनी स्वतःचा आरोग्य जपावे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. फळाबगची काळजी घ्यावी.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान तापमानात पुढील दोन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 13 ते 19 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी
व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 20 ते 26 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीचा जोर वाढल्याने काही सपाट भूभागावरील ठिकाणांच्या कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.
तर, दुसरीकडे येत्या काही दिवस तापमानाचा पारा वाढणार आहे. मात्र, यामुळे थंडीचा जोर फारसा कमी होणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
काश्मीरच्या मैदानी भागात झालेल्या हिमवृष्टीनंतर खोऱ्यातील किमान तापमानात घसरण झाली. त्यामुळे पुढील चार दिवसांत अनेक भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शुक्रवारी, धुळ्यात राज्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान 6 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम असला तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. वाऱ्यांमुळे दिवसा थंडी जाणवत आहे.
तर, संध्याकाळी तापमानाचा पारा घसरत असल्याने गारठ्यात वाढ होत आहे. धुळे, परभणी, गडचिरोली आदी ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सियसच्या खाली उतरला.
राज्यातील तापमानात येत्या काही दिवसात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. दोन दिवसात तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
दक्षिण अंदमान समुद्रात आज शनिवारी, चक्री वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे. सोमवारपर्यंत या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. पंजाबमधील काही ठिकाणी शनिवारी
आणि रविवारी तापमानाचा पारा आणखीच घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
काश्मीरच्या मैदानी भागात झालेल्या हिमवृष्टीनंतर खोऱ्यातील किमान तापमानात घसरण झाली. त्यामुळे पुढील चार दिवसांत अनेक भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शोपियान, पुलवामा आणि बारामुल्ला येथील मैदानी भागात तसेच अनंतनाग, बडगाम आणि बांदीपोरा येथील वरच्या भागातही हलकी बर्फवृष्टी झाली. हवामान खात्याने २१ डिसेंबरपर्यंत मुख्यत: कोरडे हवामान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.