विदेशात कामासाठी गेलेल्या ११ भारतीयांचा मृत्यू ;धक्कादायक कारण आले समोर
11 Indians who went abroad for work die; shocking reason revealed
जॉर्जियातील गुदौरीच्या एका रेस्टाँरंटमध्ये ११ भारतीयांचे मृतदेह आढळून आले आहेत. भारतीय दुतावासाने या घटनेबाबत पुष्टी दिली आहे. जॉर्जियातील अंतर्गत मंत्रालयाच्या प्राथमिक तपासात
कोणाच्याही शरीरावर जखमेची किंवा हिंसाचार घडला असल्याची कोणतीही खून आढळून आलेली नाही. जॉर्जियाच्या स्थानिक माध्यमांनी पोलीस सुत्रांच्या हवाले वृत्त दिले की,
कार्बन मोनोक्साइडच्या विषबाधेमुळे हा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हे एकाच भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करत होते, ज्यांचे मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममध्ये आढळून आले आहेत.
भारतीय दुतावासाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, आम्हाला आताच एक दु:खद बातमी समजली की, ११ भारतीयांचा जॉर्जियातील गु्दौरी येथे मृत्यू झाला आहे.
त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही सहवेदना व्यक्त करतो. आम्ही मृतांची माहिती जाणून घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करु.’
जॉर्जियातील रेस्टॉरंटमधील स्लीपिंग क्वॉर्टर्सच्या बाजूच्या बंदिस्त जागेत पॉवर जनरेटर बसवण्यात आला होता, ज्याचा शुक्रवारी वीज खंडित होताच तो सुरु करण्यात आला.
ज्यामुळे विषारी वायू तयार झाला आणि पसरला. ज्यामुळे तेथील भारतीयांना बाधा पोहोचली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला,
असा स्थानिक अधिकाऱ्यांच्या तपासात असा खुलासा झाला आहे. तर अधिकाऱ्यांनी मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक चाचणीचे आदेश दिले आहेत.