हज यात्रेच्या नियमांमध्ये मोठे बदल;६५ वर्षांवरील हाजींना थेट संधी

Major changes in Hajj rules; direct access to Hajj above 65 years

 

 

 

गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान सौदी अरेबिया येथील हवामानात बदल होऊन तापमान वाढ झाल्याने अनेक हाजींचा हज यात्रेदरम्यान मृत्यू झाला होता.

 

हवामानात होणाऱ्या या बदलांचा विचार करून केंद्र सरकारने वयोवृद्धांसाठीच्या हज यात्रेच्या नियमांमध्येमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

हज पॉलिसी २०२५ मध्ये आता ६५ वर्षांवरील हज यात्रेकरूंना थेट हज यात्रेला जाता येणार आहे. याशिवाय हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हज यात्रेला जाणाऱ्यांच्या कोटा कमी करण्यात आला आहे.

 

देशभरातून जाणाऱ्या एकूण हाजींच्या संख्येपैकी ३० टक्के यात्रेकरूंना खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून थेट हज यात्रेला जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

दर वर्षी हज यात्रेबाबत हज पॉलिसी जाहीर करण्यात येते. आगामी वर्षासाठी हज पॉलिसी २०२५ जाहीर करण्यात आली आहे.

 

या हज पॉलिसीमध्ये वर्ष २०२४ पर्यंत लागू असलेले काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या हज यात्रेदरम्यान आलेल्या अनुभवावरून नवीन पॉलिसी तयार करण्यात आली आहे.

 

दर वर्षी हज यात्रेला जाणाऱ्या हाजींचा कोटा जाहीर करण्यात येतो. या हाजींच्या कोट्यामध्ये आतापर्यंत ९० टक्के हज कमिटीच्या माध्यमातून हज यात्रेला प्रवासी वर्ष २०२४ पर्यंत जात होते.

 

फक्त १० टक्के प्रवाशांना खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र यंदा या कोटामध्ये बदल करण्यात आला आहे.

 

आगामी २०२५ ला हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातुन ७० टक्के हज यात्रेकरून हज यात्रेला जातील. तर ३० टक्के हज यात्रेकरून खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून हज यात्रेला जाणार आहे.

 

खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून जाणाऱ्या हाजींसाठी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून सुविधा देण्यात येते. या सुविधांमध्ये जास्तीचे पैसे भरून हाजींना जास्त सुविधा मिळणार आहे.

 

गेल्या वर्षी सौदी अरेबीया या देशात तापमानाने उच्चांक गाठला होता. अचानक तपामान वाढल्याने, हज यात्रेसाठी आलेल्या हाजींची तब्येत बिघडली होती.

 

 

हज यात्रेदरम्यान २५ किमीचे अंतर हज यात्रेकरूंना पायी जावे लागते. हज यात्रा पॉलिसी २०२४ मध्ये; तसेच त्याच्या पूर्वी ७० वर्षांवरील प्रवाशांची थेट हज यात्रेसाठी निवड करण्यात येत होती.

 

मात्र, तापमानात होत असलेल्या बदलांचा विचार करून आता हज यात्रेसाठी इच्छुक असलेल्या ६५ वर्षांवरील प्रवाशांना यंदाच्या वर्षी थेट हज यात्रेला जाता येणार आहे. हा नियम बदलल्यामुळे अनेक इच्छुकांना हज यात्रेला जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

 

 

हज यात्रेकरूंना हज यात्रेची माहिती व्हावी. त्यांना मदत व्हावी. यासाठी केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांची नेमणुक खादीमुल हुज्जाज म्हणून करण्यात येत होती.

 

सदर खादीमुल हुज्जाज हे हज यात्रेपूर्वी; तसेच हज यात्रेच्या दरम्यान देशातून हज यात्रेला जाणाऱ्या हाजींच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात होते.

 

सदर खादीमुल हुज्जाज यांच्या पदनामात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष २०२५ च्या हज यात्रेमध्ये खादीमुल हुज्जाज ऐवजी

 

हज इन्स्पेक्टर असे पदनाम या मदतीसाठी नेमलेल्या कर्मचारी अधिकारी यांना दिले जाणार आहे. सदर पद हे हज यात्रेदरम्यान किंवा हज यात्रेपर्यंतच ठेवण्यात येणार आहे.

 

आगामी २०२५ च्या हज पॉलिसीमध्ये देशभरात २० विमानतळांवरून हज यात्रेला हज यात्रेकरूंना जाण्यासाठी इन्बारकेशन पॉईट देण्यात आलेले आहे.

 

आगामी २०२५ साठी २० एम्बार्केशन पॉइंटच्या यादीत छत्रपती संभाजीनगर विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. मराठवाड्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या इच्छुकांना  संभाजीनगर एम्बार्केशन पॉइंटची निवड करता येणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *