उष्णतेचा धोका लक्षात घेता “या” जिल्ह्यात 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू
In view of the threat of heat, the ban on public gatherings will be enforced in this district till June 3
मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने तो लागलीच महाराष्ट्रात सरींचा सांगावा घेऊन येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. उकाड्यापासून एकदाची सूटका होईल म्हणून मुंबईकर आनंदले होते.
पण त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे. मुंबईत मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार असल्याची ताजी अपडेट समोर येत आहे. तोपर्यंत नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे. मुंबईत मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार आहे. आजचा दिवसही डोक्याला ताप वाढवणारा असेल.
तापमान ३६ अंशापर्यंत राहील तर आर्द्रताही ६० टक्क्यांहून जास्त असेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला, बूधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्ण वातावरणाची शक्यता वर्तवली आहे.
पावसाळा जवळ येत असल्याने मुंबई हवेतील आर्द्रता वाढली आहे. घामाचा धारा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पाणी जास्त प्या, टोपी घाला , उन्हाच्या कडाक्यात फार फिरु राहू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
उष्णतेचा धोका लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात आजपासून 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जमाबंदीचे आदेश दिले आहेत.
रस्ते डागडुजी, बांधकाम रोजगार हमी यासह वेगवेगळ्या प्रकल्पाची कामे असल्यास मजुरांना सोबत घेऊन कडक उन्हात काम न करण्याच्या वेगवेगळ्या शासकीय विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
उष्णतेच्या लाटा पाहता आरोग्य विभागाने पण नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात तापमानाने आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. काही जिल्ह्यात तापमान 45 अंशांच्या घरात पोहचले आहे.
31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, याआधीच केरळमध्ये आता मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे.
केरळमध्ये मान्सूनपूर्व हालचालींनी कहर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने केरळमधील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलप्पुझा, एर्नाकुलम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोडमध्ये 6 ते 11 सेमी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केरळचे महसूल मंत्री के राजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 9 ते 23 मे या कालावधीत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 जणांचा बुडून मृत्यू झाला. वीज पडून दोघांचा तर घर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.
ते म्हणाले की, शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय लोकांना सुट्टीच्या दिवशी त्यांच्या मुलांना तलाव किंवा नद्याजवळ जाऊ देऊ नका, असे सांगण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी स्थानिक प्रशासन, अग्निशमन विभाग, पोलीस आणि महसूल विभागाला सतर्क करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय एनडीआरएफच्या दोन तुकड्याही राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत राज्यात आठ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. केरळमध्ये अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे.