परभणीतील घटनेवरून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा कडकडीत बंद

Malkapur Pangra in Buldhana district closed due to Parbhani incident

 

 

 

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटत आहे.

 

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे आज सोमवारी, १६ डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. परभणी येथील घटनेचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत.

 

महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मलकापूर पांगरा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे गावातील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले.

सर्व जाती धर्माच्या लहान मोठ्या दुकानदार, व्यावसायिक, किरकोळ विक्रेते यांनी बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपापली दुकाने बंद ठेवली. यावेळी बसस्थानक परिसरात असलेली सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

 

या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांकडून करण्यात आली.

बंद यशस्वी करण्यासाठी मलकापूर पांगरा ग्रामपंचायतचे सदस्य राजू साळवे, कैलास साळवे, दिलीप काकडे, बाळू पवार, रामेश्वर सोनकांबळे, गजानन चरवे, किशोर साळवे, अक्षय मगर, आदींनी पुढाकार घेतला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *