राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?; अजित पवारांनी स्पष्टच बोलले
Who will be the Chief Minister if the grand coalition government comes again in the state?; Ajit Pawar spoke clearly

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. अशात महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याची चर्चा होत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.
अजित पवार करणार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन झालं. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीच्या बैठका झाल्या. त्यात मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली का? महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सरकार आल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल ते आम्ही ठरवू, असं अजित पवार म्हणाले.
आज दोन-तीन बैठक घेतल्या. पीएमपीएमएल कर्मचारी सातवं वेतन आयोगाचा फरक द्यायचा आहे. कामगारांच्यामध्ये अस्वस्थता होती.
आज बैठक घेऊन आम्ही मार्ग काढला आहे. मागच्या वेळेस चे वेतन सुद्धा द्यायचा निर्णय झाला. पुण्यातील भागात अनेक ठिकाणी पाणी गेलं. सगळ्या त्या पूरग्रस्तांना आज चेक दिला. डीबीटी पण त्यांना करण्यात आलं आहे, असं अजित पवार म्हणाले.
पुण्यातील कोयता हल्ल्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. पोलीस कायदा सुव्यवस्था ठेवतात. काल मी पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेटमध्ये होतो.
दुर्दैवी घटना आहे. यातील आरोपींवर कडकमधली कडक कारवाई केली जाणार आहे. पोलिसांचा दबदबा असलाच पाहिजे.
गुंड प्रवतीचे जे लोकं आहेत अशांवर कारवाई करणे हे आमचे काम आहे परंतु अधिक ची माहिती आयुक्त यांच्याकडून घेईल, असं अजित पवारांनी म्हटलं.
काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज निधन झालं. त्यांना अजित पवार यांनी आदरांजली अर्पण केली. वसंत चव्हाण निधन झालं आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते निवडून आले. त्यांची तब्येत खालावली होती. आज सकाळी दुःखद बातमी ऐकायला मिळाली. त्यांचं घराणे हे राजकीय होतं.
एमएलसीपद त्यांनी भूषविलं होतं. यावेळी ते खासदार झाले. कुटुंबीयांना वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेगवेगळ्या पक्षात
काम करत असलो तरी सुद्धा कटुता न ठेवता त्यांनी काम केलं आहे. मी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो, असं अजित पवार म्हणाले.